Mercury double Rajyog saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: 12 महिन्यांनंतर बुध बनवणार पॉवरफुल डबल राजयोग; या राशींच्या दारी पडणार पैशांचा पाऊस

Mercury double Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि त्यांचे योग व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम करतात. पुढील १२ महिन्यांनंतर बुध ग्रह एका विशेष स्थितीत येणार असून त्यामुळे दुहेरी राजयोग निर्माण होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात, ग्रहांचा अधिपती बुध ग्रहाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलंय. बुध हा शिक्षण, बौद्धिक क्षमता, सन्मान, व्यवसाय आणि बुद्धीचा कारक मानला जातो. परिणामी बुध ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. बुध दर १५ दिवसांनी एका किंवा दुसऱ्या ग्रहाशी युती करतो. त्यामुळे शुभ-अशुभ योग तयार होत असतात.

मकर राशीत आधीच सूर्य, शुक्र आणि मंगळ ग्रह आहेत. सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे चतुर्ग्रही योगामुळे बुधादित्य निर्माण होणार आहे. तर शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या बुध ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास

या राशीच्या लग्नाच्या घरात ग्रहांची रांग आहे. सहाव्या आणि नवव्या घराचा अधिपती बुध लग्नाच्या घरात भ्रमण करणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. अनेक महत्त्वाच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. व्यवसायातही तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्यात यश मिळू शकतं.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. कामासाठी अनेक प्रवास करावे लागू शकतात. कामाच्या ठिकाणी प्रगती, पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांचं लग्न होण्याची शक्यता आहे

वृषभ रास

लक्ष्मी-नारायण योग आणि बुधादित्य योग या राशींसाठी लाभदायक ठरू शकतात. या काळात तु्म्हाला प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही या काळात परदेशातही प्रवास करू शकता. कठोर मेहनत घेऊन तुम्ही यशस्वी होऊ शकता. या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज,ताकतीने लढण्याचा निर्धार

Valentine Day 2026 : लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे' होईल खूपच खास, वाचा 'या' ५ रोमँटिक आयडिया

IND vs NZ: तिसरा वनडे सामना ठरणार निर्णायक; कोण जिंकणार सिरीज? पाहा कशी असेल भारताची प्लेईंग ११

Solapur Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भंयकर अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

BMC Mayor: मुंबईतील जागांचा हट्ट पुरवला, पण भाजपला फटका बसला, शिंदेंना अडीच वर्षाचा महापौर देणार का?

SCROLL FOR NEXT