Budhaditya Rajyog saam tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: 12 महिन्यांनंतर शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य राजयोग; या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Budhaditya Rajyog In Kumbh 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकते. पुढील १२ महिन्यांनंतर शनी राशीत एक दुर्मिळ आणि शक्तिशाली बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात, वेळोवेळी ग्रह त्यांच्या राशीत बदल करतात. यावेळी अनेकदा ग्रहांची युती देखील होते. ग्रह एकत्रित आल्यामुळे राजयोग तयार करतात. त्याचे परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतात.

येत्या फेब्रुवारीमध्ये, ग्रहांचा राजा सूर्य आणि व्यवसायाचा हितकारक बुध यांचा युती होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. जो काही राशींचं भाग्य उजळवू शकणार आहे. या काळात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास

बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात अडकलेले तुमचे पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याच्या संधी देखील तुम्हाला मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात यश मिळू शकते. बेरोजगार व्यक्तींना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. जर तुम्ही राजकारणात सहभागी असाल तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.

वृश्चिक रास

बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या राशीच्या चौथ्या घरात तयार होणार आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुखसोयी मिळू शकतात. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग समोर येऊ शकतात. कौटुंबिक संबंधही मजबूत होतील. घरातील वातावरण सकारात्मक राहणार आहे. या काळात तुमच्या आईसोबतचे तुमचे नातेही मजबूत होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ticket Refund : रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर किती रक्कम परत मिळते? जाणून घ्या सविस्तर

Fry Pineapple Recipe: आंबट-गोड अननस फ्राय कसं बनवायचं? बघताच क्षणी तोंडाला येईल पाणी

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा झटका, घरातून बंडखोरी

Puri Recipe: Oil Free पुऱ्या खा, 'ही' रेसिपी लगेचच करा नोट

Kisanrao Hundiwale Case: किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भाजप नेत्याच्या कुटुंबातील ५ जणांना जन्मठेप

SCROLL FOR NEXT