Navapancham Rajyog on Ganesh Chaturthi saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog: 100 वर्षांनी गणेश चतुर्थीला बनला नवपंचम राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Navapancham Rajyog on Ganesh Chaturthi: आजच्या दिवशी, तब्बल १०० वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग तयार झाला आहे, ज्याला 'नवपंचम राजयोग' असे म्हणतात. हा योग काही राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार व्रत-उपवास आणि सणांदरम्यान ग्रह-गोचरामुळे शुभ योग तयार होतात. याचा परिणाम थेट माणसाच्या आयुष्यावरच नव्हे तर देश विदेशाच्या घडामोडींवरही होताना दिसतो. आज म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली होणार आहे. याच दिवशी शुक्र आणि वरुण एकत्र येऊन नवपंचम राजयोग तयार करणार आहेत.

शुक्र ग्रह कर्क राशीत राहून वरुणासोबत १२० अंशावर हा शुभ योग घडवणार आहे. यामुळे काही राशींसाठी हा काळ सोन्याचा संधीसमान ठरणार असून त्यांना संपत्ती, यश आणि मान-सन्मान मिळू शकणार आहे. यावेळी या योगामुळे कोणत्या राशींना चांगली संधी मिळणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या नशिबाची चांगली साथ लाभणारआहे. अडकलेली कामं पूर्ण होतील आणि व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळू शकणार आहे. कुठली तरी मोठी व्यवसायिक डील होण्याची शक्यता आहे. नवीन पार्टनरशिप्समुळे व्यवसाय वाढणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग खूपच सकारात्मक राहणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची दारं उघडणार आहे. समाजात तुमची प्रतिमा उंचावेल, मान-सन्मान मिळेल. मित्रांचं सहकार्य मिळाल्यामुळे मोठा फायदा होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आणि नवे उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकणार आहेत.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अनुकूल घडणार आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकणार आहे. व्यवसायात नवे अवसर हाताशी येणार आहे. आपल्या ऊर्जेचा उपयोग मोठी ध्येयं साध्य करण्यासाठी करा. सामाजिक कार्यक्रमांत सहभाग घेतल्याने नवे संबंध आणि संधी मिळणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT