Ganesh Chaturthi 100 years saam tv
राशिभविष्य

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला १०० वर्षांनी बनलाय महासंयोग; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस

Ganesh Chaturthi 2024 : यंदाचा गणेशोत्सव फार खास मानला जात असून 100 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला दुर्मिळ योगायोग घडतोय. यामुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार असून हे गणपतीचे १० दिवस शुभ ठरणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाचा गणेशोत्सव फार खास मानला जातोय, याचं कारण म्हणजे यावेळी गणेश चतुर्थीला खास योग तयार झाले आहेत. तब्बल १० दिवस सुरु असणाऱ्या या उत्सवाला धार्मिक मान्यताही आहे. यंदा भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी खूप खास आहे कारण 100 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला दुर्मिळ योगायोग घडतोय. यावेळी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्मयोग आणि इंद्र योग यांचा संयोग असून स्वाती आणि चित्रा नक्षत्र देखील असणार आहे.

अशाप्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापना आणि उपासनेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. यावेळी राशीच्या लोकांसाठी ग्रह आणि नक्षत्रांची ही स्थिती खूप शुभ असणार आहे. यामुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार असून हे गणपतीचे १० दिवस शुभ ठरणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृश्चिक रास

गणेश चतुर्थीचा सण तुमच्यासाठी आनंद घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळू शकणार आहेत. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. गणपतीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक संकट दूर होणार आहेत.

कन्या रास

यंदाच्या गणेश चतुर्थीला तुमची अपूर्ण कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी दिसून येऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. तुम्ही ठरवलेलं ध्येय गाठण्यात तुम्हाला यश मिळू शकणार आहे.

वृषभ रास

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील अनेक अडथळे दूर करू शकणार आहेत. मानसिक आणि आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता आहे. वैवाहिक नात्यात गोडवा येणार आहे. नवीन काम सुरू करण्यात यश मिळेल.तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT