Horoscope Today 27th May 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : 'या' राशींसाठी सोमवार ठरणार खास, मनासारख्या गोष्टी घडतील; कामात मिळणार यश

Anjali Potdar

आजचे पंचांग २७ मे २०२४

वार - सोमवार. तिथी - कृ. चतुर्थी. नक्षत्र - पूर्वाषाढा . योग - शुभ ०६/३७ पर्यंत नंतर शुक्ल. करण - बालव. रास - धनु १६.५ नंतर मकर. दिनविशेष - उत्तम दिवस.

मेष : दिवस आनंदाचाच जाईल

"हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी" असा आजचा दिवस आहे. देवाचे नाव मुखी ठेवा. देवाने भरपूर भाग्यात दान दिले आहे. त्याच्याकडे सकारात्मकतेने बघा. दिवस आनंदाचाच जाईल.

वृषभ : अनपेक्षित धनलाभाची शक्यता

"टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही" असा आजचा दिवस आहे. कष्ट खूप राहतील. अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे. त्याकडे विशेष लक्ष द्या. चुकीच्या मार्गाने पैसे कमवू नका.

मिथुन : मनासारख्या गोष्टी घडतील

दिवस चांगला व सकारात्मक आहे. अनेक गोष्टी मनासारख्या घडतील. कामे मिळतील. नवीन कामाची आखणी होईल. जोडीदारासह प्रेमाच्या गुजगोष्टी होतील.

कर्क : तब्येतीची काळजी घ्या

"तब्येत जरा थोडा मासा राहील" त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. खाण्यातून किंवा खराब पाण्यामधून पोट बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्येत जपा हा आजचा सल्ला आहे.

सिंह : उपासनेचे फळ मिळेल

शेअर्समध्ये किंवा लॉटरीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस बरा राहील. उपासना करा. उपासनेचे फळ आज विशेष मिळेल. रवी उपासनेने तब्येत आणि आरोग्य चांगले राहील.

कन्या : विशेष पावले उचला

जमीन जुमल्याचीच कामे अडकली असतील तर आज त्याच्यासाठी विशेष पावले उचला. कार्य तत्परता याच्यासाठी आजचा दिवस आहे. नुसत्याच घरातील गोष्टींची चर्चा करत बसू नका.

तूळ : जबाबदाऱ्या अंगावर येतील

विशेष काहीतरी कार्य आज आपल्याकडून होईल त्याकडे सकारात्मकतेने बघा. देवी उपासना फलदायी ठरेल. भावंडांच्या जबाबदाऱ्या अंगावर येतील.

वृश्चिक : कुणालाही जामीन राहू नका

कुणालाही जामीन राहू नका. खोटेपणाने घेतलेल्या गोष्टी खूप दिवस टिकत नाहीत हे लक्षात ठेवा. काही नवीन खरेदीचे योग आज येतील.

धनु : कामामध्ये व्यस्त राहा

आपले कौतुक होईल. अंगावर तोळाभर मास चढेल. कामामध्ये व्यस्त राहा. दत्तोपासना करा. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

मकर : चुकीच्या गोष्टी टाळा

परदेशात जाण्याचे योग आखत असाल तर त्याच्यासाठी आजचा दिवस कामाचा राहील. उगाचच चुकीच्या गोष्टी शक्यतो आज टाळा. नात्यांमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता.

कुंभ : कामामध्ये यश मिळेल

दैनंदिन कामामध्ये यश मिळेल. मित्र-मैत्रिणींबरोबर मजेचा दिवस राहील. ज्येष्ठांना विशेष सन्मानाचा आजचा दिवस आहे.

मीन : सकारात्मकतेने पुढे राहा

करिअर नोकरी व्यवसाय याच्यासाठी आज फिरतीचा दिवस. नोकरी व्यवसायामध्ये बदली किंवा तत्सम बातम्या कानावर येऊ शकतात. सगळ्याच गोष्टींसाठी सकारात्मकतेने पुढे राहा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT