Which Zodiac Signs Will Benefit From Saturn Jupiter Transit saam tv
राशिभविष्य

Lucky Zodiac Signs: ५०० वर्षांनंतर बनतोय दुर्मिळ महासंयोग; शनी-गुरुमुळे ३ राशींची तिजोरी तुडुंब भरणार

Which Zodiac Signs Will Benefit From Saturn Jupiter Transit: ५०० वर्षांनंतर जुलैमध्ये ग्रहांचा एक दुर्मिळ महासंयोग होणार आहे. यामध्ये शनि वक्री होईल आणि गुरु उदयाला जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचं गोचर म्हणजेच रास बदलणं ही एक नियमित प्रक्रिया मानली जाते. ज्यामध्ये ग्रह थेट, वक्री, उदय किंवा अस्त देखील होत असतात. प्रत्येक ग्रहाचा त्याच्या हालचाली आणि स्थितीनुसार १२ राशींवर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. यावेळी ५०० वर्षांनंतर दुर्मिळ महासंयोग होणार आहे. यामुळे अनेक राशींच्या व्यक्तींचं भाग्य उजळू शकणार आहे.

जून महिना सुरु झाला असून १२ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७:५६ वाजता गुरूचा अस्त होणार आहे. याशिवाय ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ४:४४ वाजता गुरूचा उदय होणार आहे. यानंतर १३ जुलै रोजी सकाळी ९:३६ वाजता शनि मीन राशीत वक्री होणार आहे. ग्रहांच्या हालचालीतील हा बदल काही राशींना मालामाल करणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या ग्रह गोचरचा वृषभ राशीवरही खोल परिणाम होणर आहे. अनेक महत्त्वाच्या परीक्षांमध्ये यश मिळण्याची अपेक्षा आहे. गुंतवणुकीच्या बाबतीतही हा काळ खूप अनुकूल असणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे.

मिथुन रास

राशीच्या लोकांसाठी हा एक उत्तम योगायोग एक उत्तम संधी घेऊन येत आहे. ५०० वर्षांनंतर घडणारा हा विशेष योगायोग त्यांचा आत्मविश्वास शिखरावर ठेवणार आहे. जे लोक नोकरी बदलण्याचा किंवा नवीन करिअर सुरू करण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी ही चांगली वेळ आहे. कुटुंबासोबत लांब प्रवास करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद येणार आहेत.

धनु रास

गुरुच्या उदय आणि शनीच्या वक्रीचा हा दुर्मिळ महासंयोग धनु राशीच्या लोकांवर खूप सकारात्मक परिणाम करणार आहे. नफ्यात अनपेक्षित वाढ होणार आहे. जीवनात आराम आणि समाधान वाढण्याची शक्यता आहे. हा काळ अविवाहित लोकांसाठी देखील खूप शुभ ठरणार आहे. त्यांना चांगले विवाह प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT