Grahan Yog 2024 saam tv
राशिभविष्य

Grahan Yog 2024: सूर्य ग्रहणापूर्वी बनला धोकादायक ग्रहण योग; 'या' राशींनी रहावं सतर्क

Surabhi Kocharekar

यंदाच्या पितृ पक्षामध्ये दोन ग्रहण लागणार आहेत. यावेळी चंद्र ग्रहण लागलं असून येत्या काही दिवसांमध्ये सूर्य ग्रहण देखील लागणार आहे. मात्र ज्योतिष्य शास्त्रानुसार, पितृ पक्षात लागणारं ग्रहण शुभ मानलं जात नाही. दरम्यान या सूर्य ग्रहणापूर्वी कन्या राशीमध्ये ग्रहण योग तयार होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, 16 सप्टेंबर 2024 रोजी सूर्य ग्रहाने गोचर केलं असून त्याने कन्या राशीत प्रवेश केलाय. याशिवाय केतू ग्रह आधीच कन्या राशीत आहे. परिणामी यामुळे त्यामुळे ग्रहण योग तयार झाला आहे.

यावेळी तब्बल १८ वर्षांनी सूर्य आणि केतूची युती झाली आहे. मात्र ही युती काही अशुभ मानली जातेय. सूर्य ग्रहणापूर्वी तयार झालेला ग्रहण योगाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी ३ राशी अशा आहेत, ज्यांच्यावर यावेळी विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

ग्रहण योगाचा या राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या शत्रूंमुळे त्रास होऊ शकतो. कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येणार नाही. तुमचे पैसे अडकण्याची दाट शक्यता आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकतं.

कन्या रास

कन्या राशीत हा ग्रहण योग तयार झाल्याने तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला त्रास होण्याचा धोका आहे. शनी ग्रहामुळे यावेळी तुम्हाला त्रास होऊ शकतो. धनहानी होण्याचा धोका अधिक आहे.

मीन रास

ग्रहण योगाचे विपरीत परिणाम या राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव राहण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India’s Famous Temple For prasad: देशातील ही 6 मंदिरे प्रसादासाठी आहेत प्रसिद्ध

'Dum Maro Dum' गाण्यावेळी अभिनेत्रीने घेतला होता चिलमचा 'कश', नशेत शूटिंग, ३२ वर्षानंतर खुलासा; जाणून घ्या नेमका किस्सा

Government Job : महिना ९५ हजार पगार अन् सरकारी नोकरी, महामंडळ सचिवालयात १६० पदांसाठी भरती; पात्रता जाणून घ्या

Maharashtra News Live Updates:संजय शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांचे निलंबन व्हायला पाहिजे - सुषमा अंधारे

Ravindra Jadeja Record: केवळ 1 विकेट अन् रविंद्र जडेजा इतिहास रचणार! हा रेकॉर्ड करणारा ठरणार तिसराच भारतीय

SCROLL FOR NEXT