आहार आणि आरोग्य

बापरे.. इथलं तापमान गेलंय ४८.१ अंशांवर 

सकाळ न्यूज नेटवर्क

विदर्भात मंगळवारपर्यंत म्हणजेच 11 तारखेपर्यंत उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असून, मराठवाड्यात आज उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.  

राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मॉन्सूनच्या केरळातील आगमनाला पोषक हवामान होत असतानाच, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमीच्या हलक्या सरी बरसत आहेत. शुक्रवारी (ता. ७) दुपारी नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. आजपासून (ता. ८) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणात रविवारपासून (ता. ९) पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज (ता. ८) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मठवाड्यातील बीड, हिंगोली, लातूर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.७ (१.०), जळगाव ४३.२ (२.८), कोल्हापूर ३३.५(१.०), महाबळेश्वर २८.३ (२.७), मालेगाव ४३.६ (६.३), नाशिक ३४.१ (-१.४), सांगली ३६.० (२.०), सातारा ३५.२ (३.०), सोलापूर ४०.४(३.६), अलिबाग ३६.० (३.०), डहाणू ३४.८ (०.५), सांताक्रूझ ३५.१ (१.९), रत्नागिरी ३३.८ (२.२), औरंगाबाद ४२.२ (७.०), बीड ३५.६ (-१.६), परभणी ४४.१ (५.०), नांदेड ४३.५ (४.०), अकोला ४५.८ (५.८), अमरावती ४६.४ (७.१), बुलडाणा ४१.५ (५.३), बह्मपुरी ४८.१ (७.६), चंद्रपूर ४७.२ (६.१), गोंदिया ४६.२ (५.६), नागपूर ४६.८ (५.९), वाशीम ४३.०, वर्धा ४७.९ (७.६), यवतमाळ ४५.८(६.४). 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अवैध रेती उपसा प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल, चाैघे अटकते; 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त

ICSE Result News | ICSE दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी

Hemant Soren: वाढलेली दाढी, गळ्यात मफलर; अटकेनंतर हेमंत सोरेन पहिल्यांदाच तुरूंगाबाहेर, नवा फोटो पाहिलात का?

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाला दाखवा आमरस पोळीचा नैवेद्य, पाहा रेसिपी

Amol Kolhe Ahemadnagar | अमिताभ बच्चनला तोडीस तोड डायलॉग!

SCROLL FOR NEXT