Here are some tips to help you avoid mood swings during periods 
आहार आणि आरोग्य

पिरेडसमध्ये मूड स्वीग्स टाळण्यासाठी प्रत्येकीने करावे हे उपाय 

सुमित सावंत

Mood-Swings : स्त्रियांना मासिक पाली येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. यामध्ये चिडचिड होणे, मळमळ होणे याप्रकरचे मूड स्वींग्स होतात. या दिवसांनामध्ये स्त्रियांच्या शरीरातील प्रोजेस्टरॉन आणि इस्ट्रोजीन या हार्मोन्सची पातळी बदल्याने चिडचिडपना वाढतो. कधी कधी खूप आनंद होतो तर कधी कधी खूप रडायला येते. तर कधी फक्त झोपून राहावेसे वाटते. तर कधी कोणाशीच बोलण्याची इच्छा नसते. अगदी उदास वाटू लागते. असा अनुभव प्रत्येक स्त्रीला आयुष्यात एकदा तरी येतच असतो. या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नसतात. पाळी येण्यापूर्वी होणारी चिडचिड ही सरळ आपल्या शरीरातिल काही महत्वपूर्ण घटकांची कमतरता आहे असे दर्शवीत असते. Here are some tips to help you avoid mood swings during periods

व्हिटॅमिन बी ६, बी १२ यांची कमतरता असेल, तुमच्या शरिरात लोह कमी असेल , तर तुमची पाळीच्या काळात चिडचिड वाढू शकते, असे तज्ञांचे मत आहे. व्हिटॅमिन बी ६ आणि बी १२ हे दोन्ही आपल्याला मुख्यत: मांसाहार या पदार्थातूनच मिळते. यामुळे जर तुम्ही शाकाहारी असाल तर शरीरातील या दोन्ही घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधोपचार घ्यायला हवे. तसेच, आपल्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, जवस, बदाम, अक्रोड यांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. 

हे देखील पहा - 


मूड स्वींग्स टाळण्यासाठी उपाय -  

- नियमितपणे काही वेळ चालायला हवे. 

-  दररोज योग आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक संतुलन चांगले राहते. 

- तज्ञांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन बी 6  , बी 12 यासह कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ची देखील औषधी घ्यावी. 

- चहा आणि कॉफी यांचे सेवन मर्यादित करावे. 

- पाळीच्या काळात सकस आहाराचे सेवा करावे. 

- तेलकट , तुपकट , मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे. 

- फळे , फिरव्या भाज्या , सूप अशा पदार्थांचे सेवन करावे.  

- साखर, मीठ, तिखट, अल्कोहोल आणि कॅफीन यांचे सेवन कमी करावे. 

- कोणताही ताण येणाऱ्या गोष्टींचा विचार करू नये. 

- पाळीच्या काळात मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. 

पाळी येण्याआधी अनेक स्त्रियांना जाणवतात या समस्या - 

-  पाळी येण्यापूर्वी अनेक स्त्रियांना पोड जड वाटू लागते. प्रोजेस्टरॉन या हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे शरिरातिल पाण्याची पातळी साठू लागते आणि ओटी पोट 
फुगल्यासारखे वाटू लागते. 

- अनेक स्त्रियांचे स्तन जड पडतात. हलकासा धक्का लागला तरी वेदना होतात. 

-  अनेक स्त्रियांना बद्धकोष्ठता किंवा डायरिया सारख्या आजरांचा त्रास असतो.  हार्मोन्सचे प्रमाण बदल्याने पचन संस्थेवर देखील  परिणाम होतो.  
 

Edited By - Puja Bonkile 


 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT