Rajesh Tope - Supriya Sule - Ekanath ShindeRajesh Tope
Rajesh Tope - Supriya Sule - Ekanath ShindeRajesh Tope 
आहार आणि आरोग्य

राज्याची रुग्णसंख्या स्थिरावली - आरोग्यमंत्र्यांची माहिती...(पहा व्हिडिओ)

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यातील कोरोना Coroan रुग्ण संख्या सध्या स्थिरावलेली असून केंद्र लॉकडाऊन Lock Down अथवा कठोर निर्बधांबाबत काय निर्णय घेतं यावर राज्याचे लक्ष आहे. मात्र लॉकडाऊनमुळे होणारे परीणाम हे मोठे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यावर १५ तारखेनंतर निर्णय घेतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले. Corona Patients rate in Maharashtra settling down say Rajesh Tope

आज टोपे यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि राजूर येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ''जलदगतीने लसीकरण व्हावं ही आमची अपेक्षा आहे.मात्र केंद्राकडून लस पुरवठा पाहिजे त्या प्रमाणावर होत नसल्याने लसीकरणाची गती मंद आहे.लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आम्ही लसींची मागणी केंद्राकडे करत आहोत,''

पण ४४ वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण जलदगतीने होण्यासाठी लसींची आवश्यकता आहे. केंद्र लस देवो अथवा न देवो आम्ही ४४ वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण जलदगतीने करणार असल्याची माहितीही टोपे यांनी यावेळी दिली. Corona Patients rate in Maharashtra settling down say Rajesh Tope

सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये बिल चेकिंग करण्यासाठी नेमण्यात आलेले ऑडिटर घरी बसून पगार घेत आहे त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांकडून खाजगी दवाखाने जास्तीचे बिल आकारत आहे असं सांगत प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑडीटर नेमण्याचे आदेश टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना दिले आहेत.ऑडिटरने बिलाची तपासणी योग्य पद्धतीने केल्यास तक्रारी येणं बंद होतील असंही ते म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

Sanjay Nirupam : त्यावेळी माझ्यासोबत दगाफटका...; शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच संजय निरुपम यांनी सांगितला तो किस्सा

SCROLL FOR NEXT