Historic Items found at Rajgadh 
एक्स्क्लुझिव्ह

'गडांचा राजा' राजगडावर सापडला ऐतिसाहिक वस्तूंचा ठेवा

संजय मिस्कीन

पिंपरी :  "गडांचा राजा आणि राजांचा गड" अशी ओळख असलेल्या राजगडावर अनमोल अशा ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा सापडलाय. सापडलेल्या वस्तूंमध्ये पेशवे आणि ब्रिटिशकालीन नाण्यांबरोबरच एक अनन्य साधारण तलवार, महालक्ष्मीची मूर्ती, लोखंडी तोफ गोळ्यासह अनेक वस्तूचा समावेश आहे. Historic Things Found at Rajgadh in Pune District

राजगडावर ज्या ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. त्यात एक अनन्य साधारण तुटललेली तलवार  सापडली आहे. या तुटलेल्या तलवारी च्या एका बाजू वर Aअसं लिहल असून त्यावर ५ स्टार आणि प्लस असा चिन्ह कोरलं आहे. तर तलवारीच्या दुसऱ्या बाजूवर ६ स्टार चिन्ह कोरले आहेत. प्राथमिक अभ्यासानुसार या तलवारीची ती रँक असून, या तुटल्याने तलवारीने ६०० पेक्षा अधिक शत्रू लोक मारले असतील असा प्राथमिक अंदाज इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. 

हे देखिल पहा

या तलवारीचा आणखी तपशीलवार अभ्यास व्हावा म्हणून ही तलवार पुरतातव खात्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने गडकिल्यांवर पर्यटक जात नाहीत त्यामुळे हीच संधी समजून पिंपरी - चिंचवड मधील गडप्रेमी तरुणांनी लॉकडाउनच्या काळात राज्या  तील  गडकिल्यांची स्वच्छता आणि संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या गड - किल्ले कार्यात 100 पेक्षा अधिक तरुण तरुणी सामील झाले आहेत. Historic Things Found at Rajgadh in Pune District

याच मोहिमे दरम्यान राजगडावर सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात हा महत्वपूर्ण ठेवा मिळाल्याने तरुणांनी असा बेल - भंडारा उधळत आपला आनंद व्यक्त केला. दरम्यान राजगडावर सापडलेल्या ह्या सर्व वस्तू पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या असून त्यावर योग्य संशोधन झाल्यास इतिहासातील अनेक महत्वपूर्ण घटनांचा उलगडा होईल अशी आशा दुर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे
.
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT