एक्स्क्लुझिव्ह

आता 1 मिनिटांत फुंकर मारुन कोरोना निदान करण्याचं तंत्रज्ञान विकसित, चाचणीचे परिणाम  90% अचूक असल्याचा दावा

साम टीव्ही

कोरोना व्हायरसच्या निदानासाठी आता नवी चाचणी विकसित करण्यात आलीय. फुंकर मारुन कोरोना निदान करण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय.

कोरोना व्हायरसच्या निदानासाठी नवनवीन चाचणी पद्धती विकसित केल्या जातायंत. आता सिंगापूरमधील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या टेस्टबाबत सर्वात जलद निकाल देणारं तंत्र विकसित केलंय. फुंकर मारून कोरोना व्हायरसची लागण झालीय की नाही, याबाबत माहिती मिळवता येणार आहे. या चाचणीची अचूनकता 90% असल्याचंही समजतंय.

या तंत्राच्या साहाय्याने श्वासांमध्ये असलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडद्वारे कोरोना व्हायरस आहे की नाही याबाबत माहिती घेतली जाईल. विशेष म्हणजे या चाचणीसाठी १ मिनिटापेक्षा कमी कालावधी लागणार आहे. या चाचणीचे परिणाम  हे ९० टक्के अचूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. सिंगापूरमध्ये हे टेस्ट किट तयार करण्यात आलंय. 180 रुग्णांवर आतापर्यंत या चाचणीचं परीक्षण करण्यात आलंय.

  • ऑर्गेनिक कंपाऊंडद्वारे कोरोनाचं निदान
  • चाचणीसाठी १ मिनिटापेक्षा कमी कालावधी
  • चाचणीचे परिणाम  ९० टक्के अचूक असल्याचा दावा
  • सिंगापूरमध्ये या टेस्ट किटची निर्मिती 
  • 180 रुग्णांवर आतापर्यंत या चाचणीचं परीक्षण
     

कोरोनाचं निदान जितक्या लवकर तितक्या जलदगतीनं उपचार शक्य होतात. सिंगापूरमध्ये तयार होणारे हे टेस्टिंग किट्स अवघ्या मिनिटभरात अचूक निकाल देतात. त्यामुळे या नव्या किट्समुळे कोरोनाशी लढाईत नक्कीच बळ मिळणार, हे निश्चित.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

Mumbai Court Raps Ed: खटल्याला उशीर झाला, आरोपींनी अधिकची शिक्षा भोगली, ईडीला कोर्टाने फटकारलं

Madha Constituency: झुकणार नाही लढणार! निवडणुकीनंतर अनेक गोष्टींना तोंड देण्याची माझी तयारी; धैर्यशील मोहिते पाटलांचे फडणवीसांना प्रतिआव्हान

Bhabha Hospital News : पेशंटकडून नर्सला मारहाण, कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन

Panchayat 3 Released Date : अखेर ठरलं..., 'पंचायत ३' याच महिन्यात रिलीज होणार; कहाणीत कोणता नवा ट्वीस्ट येणार ?

SCROLL FOR NEXT