Zee Marathi Serial saam tv
मनोरंजन बातम्या

Zee Marathi Serial : कमळी अन् लक्ष्मी आल्या एकत्र; लोकप्रिय मालिकांचा महासंगम, वेळ अन् तारीख आताच नोट करा

Zee Marathi Serial Mahasangam Episode : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. तारीख आणि मालिकांची नावे लिहून घ्या.

Shreya Maskar

नवीन वर्षात नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'झी मराठी' च्या मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे.

मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहेत.

सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी 6' ची चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉसला कायम जास्त टीआरपी मिळत आला आहे. त्यामुळे बिग बॉसला टक्कर देण्यासाठी विविध चॅनेल नवीन मालिका, मालिकांचे महासंगम, रिअ‍ॅलिटी शो काढत आहेत. नुकताच 'झी मराठी' वाहिनीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लोकप्रिय मालिकांच्या महासंगमाची घोषणा केलेली पाहायला मिळत आहे.

'झी मराठी' वाहिनीवरील दोन मालिका 'लक्ष्मी निवास' आणि 'कमळी' यांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "महाराष्ट्राच्या सुपरहिट मालिकांचा महासंगम होणार! काय होणार 'या' अनोख्या महासंगमात?...पहायला विसरू नका!" हा महासंगम 11 जानेवारीपासून रात्री 8 ते 9.30 वाजता पाहायला मिळणार आहे. ही भाग तब्बल दीड तासांचे असणार आहे.

'झी मराठी'ने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अक्षय देवधर, हर्षदा खानविलकर, दिव्या पुगांवकर आणि विजया बाबर पाहायला मिळत आहे. या महासंगमामुळे चॅनेल आणि मालिकांच्या टीआरपीत वाढ होणार असल्याचे बोले जात आहे. 'लक्ष्मी निवास' आणि 'कमळी' या दोन्ही मालिकांमध्ये आता रंजक वळण पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा महासंगम कमळी आणि लक्ष्मीच्या आयुष्यात नेमकं कोणते वळण घेऊन येतो. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'बिग बॉस मराठी 6'

रितेश देशमुखचा 'बिग बॉस मराठी 6' हा रिअ‍ॅलिटी शो 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर यंदाचपाहायला मिळणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोण-कोणते कलाकार शोमध्ये झळकणार याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

SCROLL FOR NEXT