Kamali Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी' सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून कमळीच्या आयुष्याशी संबंधित मोठं रहस्य उलगडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कमळीची आई गौरी अनेक वर्षांपासून जिवंत नाही हा गैरसमज दूर होणार आहे. याचबरोबर कामिनीचा आणखी एक धक्कादायक कट उघड होणार असल्याने आगामी भाग अधिक रंगतदार होणार आहे.
प्रोमोमध्ये अन्नपूर्णा आजी साईबाबांच्या मंदिरात भंडाऱ्याचं आयोजन करताना दिसते. या धार्मिक कार्यक्रमाला अनेक भाविक उपस्थित राहणार असतात. मात्र, याच संधीचा फायदा घेत कामिनी आपला दुष्ट डाव आखते. ती प्रसादात विष मिसळून मोठा अनर्थ घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. तिच्या या कारस्थानामुळे सर्वांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेत असलेली गौरी रुग्णालयात दाखल असल्याचं दिसतं. राजन तिची मदत करत असताना कमळीही तेथे पोहोचते. मात्र, त्या दोघींची प्रत्यक्ष भेट होणार की पुन्हा काही अडथळे येणार, याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. अनेक वर्षांनंतर मायलेकी समोरासमोर येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
कमळीच्या जन्माचं रहस्य, गौरीचं आयुष्य आणि कामिनीची कारस्थानं या सगळ्या गोष्टी आता एका मोठ्या टप्प्यावर आल्याचं दिसत आहे. कामिनीचा विषारी डाव यशस्वी होणार का? कमळी वेळेत हा कट उधळून लावणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमळीला तिची आई गौरी जिवंत असल्याचं कळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.