Zee Marathi Paaru Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Paaru Serial: होणार सून मी ह्या घरची...; गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या दिशाची किर्लोसकरांच्या घरात जबरदस्त एन्ट्री

Zee Marathi Paaru Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'पारू'मध्ये आता प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेतील जुनी खलनायिका दिशा पुन्हा एकदा किर्लोस्कर कुटुंबात सून म्हणून परतली आहे.

Shruti Vilas Kadam

Zee Marathi Paaru Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'पारू'मध्ये आता प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेतील जुनी खलनायिका दिशा पुन्हा एकदा किर्लोस्कर कुटुंबात सून म्हणून प्रवेश करताना दिसणार आहे. याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या मालिकेत पारू आणि आदित्यची प्रेमकहाणी पुढे जात आहे. पारूच्या वडिलांना या नात्याची माहिती असल्याने ते त्याचा विरोध करत आहेत. दुसरीकडे, अनुष्का आणि दिशा यांच्या कटकारस्थानाचा भांडाफोड पारूने केला होता. यात अनुष्काचा मृत्यू झाला, तर दिशा सुटून बाहेर पडली.

आता दिशा नविन नाव घेऊन किर्लोस्कर घरात सून म्हणून परत येणार आहे. ती अहिल्यादेवीसमोर ठामपणे उभी राहत "मी होणार ह्या घरची सून" असं स्पष्ट सांगते. दिशाची एन्ट्री देखील होणार सून मी ह्या घरची या गाण्याने होती. ज्यामध्ये सगळे स्थिर उभे असलेले दिसत आहेत तर, दिशा एकटीच सगळ्या कुटुंबाभोवती नाचताना दिसत आहे.

या दिशाच्या एन्ट्रीवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रीया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले,नसेल सुचत नवीन काही तर संपून टाका ना. आणखी एकाने लिहीले, सासू Mom बोलणारी आली. तर एका नेटकऱ्याने लिहिले, ती दिशा सारखी जाऊन येईल पण paru अणि आदित्य लग्न kai या जन्मात होणार नाही.

दिशाचा खरा हेतू काय आहे आणि ती पुढे काय करणार हे येणाऱ्या भागांमध्ये उघड होणार आहे. दिशाच्या पुनरागमनामुळे मालिकेत नवा रंग भरला जाणार असून पारू-आदित्यच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT