Sara Ali Khan Did Not Spend Rs 400 In Roaming Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan Stingy: ‘कोणी हॉटस्पॉट देतं का?...’, इतकी कंजूस की करोडो रुपये कमावून सुद्धा दुसऱ्यांचं इंटरनेट वापरते सारा

Sara Ali Khan Trolled: साराचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिचा कंजूसपणा कमालीचा चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Sara Ali Khan Did Not Spend Rs 400 In Roaming: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित झाला असून सध्या ती देशभरात प्रमोशन मध्ये व्यग्र आहे. साराचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिचा कंजूसपणा कमालीचा चर्चेत आला आहे. सध्या नेटकऱ्यांनी तिच्या कंजूसपणावरून तिला ट्रोलिंग करायला सुरूवात केली आहे.

नुकतीच सारा आयफा अवॉर्डसाठी अबू धाबीला गेली होती. ब्रूट इंडियाशी साधलेल्या संवादात ती म्हणाली , "मी रियल लाईफ मध्ये खूप कंजूस आहे. जेव्हा मी अबू धाबीला आली, तेव्हा निर्माते दिनेश विजानने मला व्हॉइस नोट पाठवली. त्यात ते म्हटले की रोमिंगचा रिचार्ज फक्त ४०० रुपयांना येतो तर तो कर. पण जेव्हा मी तिकडे विचारले तर कळलं की १० दिवसांचा रिचार्ज ३००० रुपयांना आहे. तेव्हा मी विचार केला की मी इकडे एका दिवसांसाठी आली आहे तर कशाला एवढे पैसे खर्च करु. मी माझ्या हेअर ड्रेसरचे हॉटस्पॉट घेऊन काम चालवले." यावरून तिला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केले.

साराचा हा कंजूसपणा काही पहिल्यांदाच नेटकऱ्यांनी पाहिलेला नाही. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विकी- सारा प्रमोशनमध्ये असताना तिचा कंजूसपणा सर्वांनीच पाहिला. तिने आईला टॉवेल खरेदीवरून चांगलेच फटकारले होते. साराच्या आईने १६०० रुपयांचा टॉवेल विकत घेतला होता. टॉवेलसाठी एवढा पैसा का खर्च करतो. व्हॅनिटी व्हॅनमध्ये असे टॉवेल दोन-तीन मोफत मिळतात. यावरून देखील तिला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केले.

सारा- विकी प्रमुख भूमिकेत असलेले ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एका दिवसात ६ कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT