Armaan Malik Saam Tv
मनोरंजन बातम्या

Armaan Malik: युट्युबर अरमान मलिकने केलं चौथं लग्न? करवा चौथच्या त्या व्हिडीओमुळे एकच चर्चा

Armaan Malik Fourth Marriage:अरमानल मलिकने चौथं लग्न केलं असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अरमान मलिकला यामुळे चांगलेच नेटकऱ्यांनी चांगलेच निशाण्यावर धरले आहे.

Manasvi Choudhary

युट्यूबर अरमान मलिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे कायमच लाईमलाईटमध्ये राहतो. अलीकडेच अरमान मलिकने त्याच्या दोन पत्नींसह बिग बॉस ओटीटी 2 मध्ये दिसला होता. अशातच अरमानल मलिकने चौथं लग्न केलं असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अरमान मलिकला यामुळे चांगलेच नेटकऱ्यांनी चांगलेच निशाण्यावर धरले आहे.

दोन पत्नीमुळे कायमच लक्ष वेधून घेणारा अरमान मलिकने चौथं लग्न केलं असल्याचं बोललं जात आहे. व्हायरल झालेल्या माहितीनुसार, अरमान मुलांचा सांभाळ करणाऱ्या महिलेशी चौथं लग्न केले आहे. याचं कारण म्हणजे नुकतेच करवा चौथ हा सण साजरा झाला. यामध्ये अरमान मलिक यांच्या मुलांना सांभाळ करणारी महिला देखील दिसून आली सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ पोस्ट झाले आहेत. दरम्यान, तिच्या हातावरील मेहंदीने लक्ष वेधून घेतले. तिच्यावर हातावर संदीप उर्फ अरमान मलिकचे नाव असल्याची नेटकऱ्यांची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर अरमान मलिकने चौथे लग्न केले की काय असं बोललं जात आहे.

अरमान मलिकचे पहिले लग्न झाले ते जास्त काळ टिकले नाही. यानंतर अरमानने पायल मलिकशी लग्न केले. दरम्यान पायलची मैत्रिण कृतिकाच्याही तो प्रेमात पडला आणि तिच्याशी त्याने लग्न केले. आता चौथ्या लग्नाची चर्चा मुलांचा सांभाळ करणारी लक्ष हिच्याशी झाल्याची चर्चा आहे. लक्ष ही अरमान मलिकच्या मुलांचा सा्ंभाळ करते. ती अरमानच्या कुटुंबियांच्या जवळची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चुलीवर भाकरी भाजत वंचित बहुजन विकास आघाडीचे आंदोलन

दिव्यांग बांधवांच्या आंदोलनादरम्यान एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

CEC Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांना जोरदार झटका

मुंबईत बसून दिल्ली हादरवण्याचा डाव, जैशच्या दहशतवाद्याचं टॉय कनेक्शन

India’s Largest Railway Station: भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं माहितीये का?

SCROLL FOR NEXT