Tollywood Actor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tollywood Actor: दाक्षिणात्य चित्रपटासोबत कलाकारांच्या मानधनातही घसघशीत वाढ, एका चित्रपटासाठी कलाकार घेतात 'इतके' मानधन...

२०२२ या वर्षात बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा होता.

Chetan Bodke

Tollywood Actor: २०२२ या वर्षात बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा होता. चित्रपटांसोबतच यावर्षात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारही चर्चेत होते. या वर्षात अनेक दाक्षिणात्य चित्रपटही प्रदर्शित झाले, त्यातील बरेच चित्रपट ब्लॉकबस्टरही ठरत बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाईही केली.

चित्रपटांतील कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले. अनेक दिग्गज कलाकारांनीही चित्रपटांसाठी भरमसाठ फी आकारली आहे. चला तर एक नजर टाकूया कोणकोणत्या कलाकारांनी तगडी फी आकारली आहे.

Kamal Haasan

कमल हसन (Kamal Hasan)

या यादीत ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांचे ना व प्रथम येते. कमल हसन यांना चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ झाला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. एखाद्या चित्रपटात अभिनेत्याची उपस्थिती ही त्याच्या यशाची हमी मानली जाते, असे म्हटले जाते.

अभिनेत्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'विक्रम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून त्या चित्रपटासाठी भरमसाठ फी आकारली होती. कमल हसनची गणना केवळ दिग्गज अभिनेत्यांमध्येच नाही, तर भरमसाठ फी घेणाऱ्या अभिनेत्यांमध्येही केली जाते. सोबतच कमल हसन आगामी 'इंडियन 2' चित्रपटासाठी 150 कोटी रुपये घेत आहे.

Prabhas

प्रभास (Prabhas)

या यादीतील पुढचे नाव प्रभासचे आहे. दाक्षिणात्य सिनेमातील 'बाहुबली' फेम प्रभास सध्या बराच चर्चेत आहे. प्रेक्षक त्याच्या अभिनयासाठी इतके वेडे आहेत की ते नेहमीच आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. 'बाहुबली' चित्रपटामुळे प्रभासची लोकप्रियता बरीच वाढली आहे. प्रभास एका चित्रपटासाठी भरमसाठ फी ही आकारतो. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभासने त्याच्या पुढील चित्रपटासाठी 150 कोटी रुपये फी मागितली आहे.

Mahesh Babu

महेश बाबू (Mahesh Babu)

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू अनेक काळापासून मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. प्रत्येक चित्रपटात तो आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. महेश आधीही त्याच्या चित्रपटांसाठी भरमसाठ फी घ्यायचा, पण आता त्याने चित्रपटाची फी वाढवली आहे. महेश बाबू दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटात काम करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महेशने यासाठी फी म्हणून 100 कोटी रुपये मागितले आहेत.

Allu Arjun

अल्लू अर्जुन (Allu Arjun)

सुपरस्टार अल्लू अर्जुन नेहमीच सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत अग्रेसर असतो. अल्लू अर्जुनच्या प्रत्येक चित्रपटाची प्रशंसा होत असली तरी 'पुष्पा' चित्रपटानंतर त्याने स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद ही दिली आहे. अल्लू अर्जुनचे 'पुष्पा' चित्रपटातील संवाद आणि गाणी आजही चाहत्यांच्या ओठावर आहेत. 'पुष्पा'च्या शानदार यशानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या पुढच्या भागासाठी ७५ ते १०० कोटी रुपये फी मागितली आहे.

Junior NTR And Ramcharan

ज्युनियर एनटीआर आणि रामचरण (Junior NTR And Ramcharan)

एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाने यंदा यशाचा नवा इतिहास रचला. राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. चित्रपटाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण मुख्य भूमिकेत असणाऱ्या 'आरआरआर' या चित्रपटाने भारतात या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत नाव कमावले आहे. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कलाकारांनी या चित्रपटासाठी 50 ते 75 कोटी रुपये इतके मानधन घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Famous Food: साताऱ्यातील प्रसिद्ध 5 पदार्थ, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर कडकडीत बंद

Gold Rate Today: सोनं झालं आणखी स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

Maharashtra Politics: शरद पवारांना धक्का बसणार? महत्त्वाच्या बैठकीला ३ आमदारांची दांडी, पक्षात जोरदार चर्चा

White & Pink Guava : गुलाबी आणि सफेद पेरुमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT