Brahmastra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Controversial Movies: २०२२ मधील बॉलिवूडचे सर्वात चर्चित वाद आणि चित्रपट, वाचा सविस्तर…

दरम्यान, बॉलिवूडसाठी हे वर्ष थोडं काही आनंदीत तर काही दु:खी असं होतं. कारण या वर्षात अनेक बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले, तर अनेक छोटे बजेट चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले.

Chetan Bodke

Controversial Movies: 2022 वर्षाला निरोप देण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाचं 2022 वर्ष बॉलिवूडसाठी थोडं आनंदीत तर थोडं दु:खी होतं. कारण या वर्षात अनेक बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले, तर अनेक छोटे बजेट चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. चित्रपटांव्यतिरिक्त कलाकारांचे काही वाददेखील बरेच चर्चेत होते. एक नजर टाकूया या वर्षात बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले विवाद

The Kashmir Files

द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files)

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट यावर्षी 11 मार्च रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला होता. तो वर्षभर त्याच्या यशामुळे आणि वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत कायम राहिला. नुकतेच इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी IFFI 2022 च्या समारोप समारंभात या चित्रपटाला हास्यास्पद आणि अपप्रचारात्मक संबोधित करुन नवा वाद निर्माण केला होता. काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान देशभरात बरेच वातावरण तापले होते.

Ranveer Singh Birthday News

रणवीर सिंग फोटोशूट (Ranveer Singh Photoshoot)

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंगने केलेले न्युड फोटोशूटही यावर्षी बरंच चर्चेत होतं. एका प्रसिद्ध मासिकासाठी केलेल्या रणवीरच्या या फोटोशूटवरून सोशल मीडियासह राज्यात बराच गदारोळ झाला होता. इतकेच नाही तर रणवीर सिंगवर सोशल मीडियापासून तळागाळापर्यंत बरीच टीकाही झाली. या वादग्रस्त फोटोशूटमुळे रणवीरवर गुन्हा दाखल झाला होता.

Kaali Poster

'काली' पोस्टर (Kaali Poster)

2022 मध्ये 'काली' या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून बराच वाद झाला होता. या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक लीना मनिमेकलाई यांनी 'काली'चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये कालीच्या रुपात एक मुलगी सिगारेट ओढताना दिसत आहे, यावरून वाद झाला होता. यानंतर लीनावर हरिद्वारमध्ये हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

Brahmastra

'ब्रह्मास्त्र' (Brahmastra)

रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' या वर्षातील सुपरहिट चित्रपटांच्या श्रेणीत आला आहे. मात्र या चित्रपटातील एका दृश्यावरून बराच वाद झाला होता. खरं तर, 'ब्रह्मास्त्र'च्या ट्रेलरदरम्यान, एका सीनमध्ये रणबीर शूज घालून मंदिराची घंटा वाजवताना दिसला होता. या सीनवरून बराच गदारोळ झाला होता. पण नंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी स्पष्टीकरण दिले.

Lal Singh Chaddha Poster

लालसिंग चड्ढा (Lal Singh Chaddha)

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा बहुचर्चित चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा' यावर्षी बराच चर्चेत होता. या चित्रपटात एका दिव्यांग मुलाला भारतीय लष्कराचा शिपाई म्हणून दाखवल्याने बराच वाद निर्माण झाला होता. एवढेच नाही तर चित्रपटात आमिरचा एक संवाद दाखवण्यात आला आहे, त्यामुळे सर्वत्र बराच वादंग निर्माण झाला होता.

The Kerala Story

द केरला स्टोरी (The Kerala Story)

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या टीझरवरून बराच गदारोळ झाला होता. चित्रपटाच्या टीझरमध्ये 32000 महिलांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांना दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी जबरदस्तीने कट्टरपंथी बनवण्यात आले होते. केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या चित्रपटाच्या निर्मात्यांवर करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT