Ye Re Ye Re Paisa 3 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ye Re Ye Re Paisa 3 : 'येरे येरे पैसा ३' फक्त ९९ रुपयांत पाहता येणार, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

Ye Re Ye Re Paisa 3 Movie Ticket In Rs 99 Rupees : सध्या थिएटरमध्ये 'येरे येरे पैसा 3' चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी ऑफर प्रेक्षकांना दिली आहे.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन होत आहे. नुकताच मराठी चित्रपट 'येरे येरे पैसा 3' (Ye Re Ye Re Paisa 3) रिलीज झाला आहे. चित्रपटाने खूप कमी दिवसांत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.'येरे येरे पैसा 3' चित्रपट 18 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात धमाल कॉमेडी पाहायला मिळत आहे. चित्रपटाची गाणी सोशल मिडिया धुमाकूळ घालत आहे.

पहिल्या दिवसापासून 'येरे येरे पैसा 3' चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले आहे. 'येरे येरे पैसा 3'चे शो हाऊसफुल पाहायला मिळत आहे. अशात आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'येरे येरे पैसा 3' चित्रपट आता खास ऑफर घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तुम्हाला हा चित्रपट 99 रुपयांत पाहता येणार आहे. नेमकी ऑफर काय, जाणून घेऊयात.

'येरे येरे पैसा 3'च्या निर्मात्यांनी नुकतीच एक खास ऑफर दिली आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून ही ऑफर त्यांनी जाहीर केली आहे. पोस्टनुसार 'येरे येरे पैसा 3' चित्रपट येत्या 22 तारखेला म्हणजे मंगळवारी 99 रुपयांत पाहता येणार आहे. तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये तुम्ही चित्रपट पाहायला जाऊ शकता. 99 रुपयांच्या ऑफरमुळे चित्रपटाच्या कामाईत नक्कीच वाढ होईल असे दिसून येत आहे.

'येरे येरे पैसा 3' चित्रपट संजय जाधव दिग्दर्शित आहे. यात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. तेजस्विनी पंडित, उमेश कामत आणि सिद्धार्थ जाधव यांच्या जोडीने बॉक्स ऑफिस गाजवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT