Sameer Paranjape Writes Emotional Post For Vinesh Phogat twitter
मनोरंजन बातम्या

Samir Paranjape Post : “सांत्वन वैगरे काही नाही...”, मराठी अभिनेत्याची कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी भावुक पोस्ट

Chetan Bodke

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये अपात्र ठरल्यामुळे अवघा देशाचा हिरमोड झाला आहे. अख्ख्या देशाला विनेश फोगाटकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. पण तिचं वजन प्रमाणापेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. दरम्यान, विनेश फोगाट ५० ग्रॅम वजनी गटातून कुस्तीमध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश निराश झाला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी पोस्ट शेअर करत तिच्यासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मराठी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिचे कौतुक केले आहे. यामध्ये किरण माने, अभिजित केळकर, तेजस्विनी पंडित, उत्कर्ष शिंदे, हेमंत ढोमे सह अनेक कलाकारांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. अशातच आता या यादीमध्ये आणखी एका सेलिब्रिटीचाही समावेश झाला आहे.

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील अभिनेता समीर परांजपेने विनेशला उद्देशून भावुक पोस्ट शेअर केली आहे.

विनेश फोगाटसाठी लिहिलेली अभिनेता समीर परांजपेची पोस्ट,

"प्रिय विनेश,

होय आता "प्रिय" लिहिणारच... वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं आहेस अगं. ट्रेंडिंगमध्ये आहेस तू... 'धाकड है धाकड हैं' ऐकु येतंय जिथे तिथे... १०० ग्रॅमने ते मेडल हुकलं आहे पण ठीक आहे आता येत्या विकेंडला "बसून" चर्चा करून ठरवू आम्ही नक्की काय झालं ते... म्हणजे सगळया शक्यता तपासू. या मागे नक्की कुणाचा हात होता हे शोधून काढूच आम्ही. मग त्याच्या नावाने शंख करू सोशल मीडियावर तू काळजीच करू नकोस... काही महिन्यांपूर्वी तुला रस्त्यावरून फरपटत नेताना आम्ही केला होता ना शंख अगदी तेवढाच धारदार... बोललो होतो खेळ सोडून हिला आता हिरो बनायची काय हौस आहे. राजकारण आहे रे सगळं... नाटकं आहेत सगळी... करीयर संपणार बघ हिचं. पण आमची सगळ्यांची ठासलीस... "बांबू" नाही पॅरिस चा "आयफेल टॉवर" लावलास आम्हाला... कौतुक किंवा सांत्वन वैगरे काही करणार नाही कारण त्या कशाचीच तुला गरज नाहीये. तु अजेय आहेस... पण एक नक्की.. जेव्हा कधी प्रतिकूल परिस्थितीत ही संकटाच्या छाताडावर उभं राहणं म्हणजे काय हे कोणाला सांगायची वेळ येईल ना तेव्हा फक्त तुझा हा फोटो दाखवेन मी समोरच्याला... Happy ending नसणारे वेगळ्याच ट्वीस्टने संपणारे हॉलिवूड सिनेमे बघत बॉलिवूडच्या हॅप्पी ending सिनेमांना शिव्या घालणारे आम्ही आज मात्र हॅप्पी ending होवो यासाठी प्रार्थना करत होतो. पण बहुदा नियतीलाही हे माहिती असावं की हा The End नाहीये, असता कामा नये... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..."

दरम्यान, विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये अपात्र ठरल्यामुळे तिने आज (८ ऑगस्ट) व्यावसायिक कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अभिनेत्रीने ही निवृत्तीची घोषणा एक्सवर पोस्ट शेअर करत केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये विनेश म्हणालीय, "आई, माझ्याविरुद्धचा सामना कुस्तीने जिंकला, मी हरले. तुझी स्वप्नं आणि माझं धैर्य चकनाचूर झालंय. आता माझ्याकडे आणखी ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी तुम्हा सर्वांची कायम ऋणी राहीन. मला माफ करा." या पोस्टमुळे आता क्रीडाक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT