Box Office Collection Of Kapil Sharma And Rani Mukharjee  Saam TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection: कपिल शर्मा की राणी मुखर्जी? कोणाच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी

‘Mrs Chatterjee Vs Norway’ Box Office Collection: झी स्टुडिओने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती केली आहे.

Pooja Dange

‘Mrs Chatterjee Vs Norway’ Box Office Collection: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा दोन वर्षांनी चित्रपटामध्ये प्रदर्शित झाला आहे. या शुक्रवारी म्हणजे १७ मार्चला राणीचा 'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटामध्ये राणी 'आई'ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.

'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' हा चित्रपट सागरिका चक्रवर्ती यांचे आत्मचरित्र 'द जर्नी ऑफ अ मदर'वर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिशा छिब्बरने केले आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी एकूण २५ करोड रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाने जगभरात ७.७७ कोटींची कमाई केली आहे. झी स्टुडिओने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३.२२ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ४.५५ कोटींची कमाई केली आहे.

तरण आदर्श यांनी 'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपटाचे देशांतर्गत कलेक्शन सांगितले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १.८३ कोटी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी १.५८ कोटीचे कलेक्शन केले आहे.

रविवारी 'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपट आणखी कमाई करू शकतो असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटासोबत कपिल शर्माचा 'झ्विगॅटो' देखील प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षक विभागले जाणार आहेत.

'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटामध्ये राणी व्यतिरिक्त जिम सरभ, नीना गुप्ता आणि अनिर्बन भट्टाचार्य देखील मुख्य भूमिकेत आहेत. समीक्षकांसह कलाकारांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच सोशल मीडियावरही या चित्रपटाचे नेटकरी प्रशंसा करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

Masala Kairi Recipe: जिभेचे चोचले पुरवणारी चटपटीत मसाला कैरी घरी कशी बनवायची?

LPG Cylinder VS Induction: LPG की इंडक्शन? कशावर जेवण बनवणे जास्त स्वस्त

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध

MP News : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलीचं निधन, कुटुंबासह पक्षावर शोककळा

SCROLL FOR NEXT