Sohail Khan- Seema Khan
Sohail Khan- Seema Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sohail Khan Divorce: लग्नाच्या 24 वर्षानंतर सोहेल-सीमा खान घेणार घटस्फोट ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sohail Khan and Sema Khan Divorce: बॉलिवूड अभिनेता सोहेल खान आणि सीमा खान यांचा घटस्फोट होणार आहे. लग्नाच्या 24 वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हणले जात असले. सोहेल खान आणि सीमा खान आज कौटुंबिक न्यायालयाबाहेर दिसले होते. त्या दोघांचे फॅमिली कोर्टाबाहेरचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यांनी अद्याप त्यांच्या घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नसले तरी रिपोर्ट्सनुसार, ते घटस्फोट घेणार आहेत असे म्हंटले जात आहे.

वृत्तानुसार, कौटुंबिक न्यायालयातील एका सूत्राने सांगितले की, सोहेल खान आणि सीमा खान आज न्यायालयात हजर होते. दोघांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर दोघेही आपापल्या कारमधून तेथून निघून गेले. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सांगण्यात येत आहे की, ते दोघे गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहत आहेत.

सोहेल खान आणि सीमा खान 1998 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहान नावाची दोन मुले आहेत. 2017 मध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, सोहेल आणि सीमा वेगळे झाल्याची माहिती समोर आली होती. 'द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' या शोमध्ये सोहेल आणि सीमा वेगळे राहतात आणि मुलं दोघांसोबत राहतात असे देखील दाखवण्यात आले होतं.

कोण आहेत सीमा खान? (Who is Seema Khan)

सीमा खानचे खरे नाव सीमा सचदेव आहे. त्या व्यवसायाने फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट आहेत. सीमा यांनी स्वत:चे कॅलिस्टा नावाचे सलूनही उघडल्याचे वृत्त आहे. सुझैन खान आणि महीप कपूर यांच्यासोबत त्यांनी मुंबईतील वांद्रे येथे 190 लक्झरी बुटीक उघडले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

Pankaja Munde News | घोषणा देणाऱ्या आंदोलकांशी मुंडेंचा संवाद!

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

SCROLL FOR NEXT