TMKOC Saam Tv
मनोरंजन बातम्या

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 'दयाबेन'ने का सोडली मालिका, शोच्या 'बावरी'ने उघडले गुपित, म्हणाली...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो बऱ्याच दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Shivani Tichkule

Entertainment News: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो बऱ्याच दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये मिसेज सोढी यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर इतर अनेक शो सोडलेल्या स्टार्सनीही मेकर्सवर गंभीर आरोप केले. 'तारक मेहता'मध्ये बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरियानेही शोच्या निर्मात्यांविरोधात आघाडी उघडली आहे. (Latest Marathi News)

त्याचवेळी, मोनिकाने पुन्हा एकदा शोच्या सेटवर स्टार्ससोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. दयाबेन उर्फ ​​दिशा वाखानी हिने याच कारणांमुळे शो सोडला असावा असे मोनिकाने सांगितले आहे.

दयाबेन उर्फ ​​दिशा वखानीने 'तारक मेहता' शो का सोडला?

बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत, मोनिकाने सांगितले की, दिशा नक्कीच दुखावली गेली असावी किंवा शोमध्ये परत येण्यासाठी तिला चांगले मानधन मिळाले नसेल. मोनिका म्हणाली, "मला यावर काही भाष्य करायचे नाही. (Entertainment News)

अनेक कलाकारांचे मानधन वेळेवर दिले नाही

तर ETimes टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मोनिकाने सांगितले की, तिलाही मानधनच्या समस्येचा सामना करावा लागला, त्यामुळे अनेक कलाकारांनी शो सोडला. मोनिका म्हणाली, "मला माझ्या मेहनतीच्या पैशासाठी वर्षभर झगडावं लागलं, तरीही ते माझे पैसे द्याला तयार नव्हते.

जेव्हा मी त्यांना सांगितलं की, आता मी CINTAA कडे तक्रार करणार आहे, त्या वेळी ते घाबरले आणि माझे पैसे दिले. शोसोबतच्या माझ्या सहा वर्षांच्या प्रवासात मला कधीही ठरलेले मानधन मिळाले नाही. मानधन काय ठरले होते ते मला आठवत नाही.

मोनिका पुढे म्हणाली की, त्यांनी प्रत्येकाचे मानधन उशिरा दिले. मग ते शैलेश जी, गुरचरण सिंह, राज अनाडकट, जेनिफर, नेहा मेहता या सर्वांनाच या समस्यांचा सामना करावा लागला आहे. मी त्यांना नोटीस पाठवल्यावर त्यांनी माझे मानधन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: २० वेळा फेल, एकदा नव्हे तर दोनदा UPSC पास; विवेक यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Coffee Pudding Recipe: विकेंडला लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी कॉफी पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार

IAS Transferred: सात वरिष्ठ IAS आणि PCS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

Nauvari Saree Blouse Patterns: नऊवारी साडीवर उठून दिसतील हे 8 ट्रेंडिंग ब्लाउज पॅटर्न; गुढीपाडव्याला तुमच्यावर खिळतील लोकांच्या नजरा

SCROLL FOR NEXT