Choreographer Of Shah Rukh Khan Dance In Jawan Instagram @redchilliesent
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Dance In Jawan : जवानच्या प्रिव्ह्यूमधील 'बेकरार करके...' कोणी कोरिआग्राफ केलंय माहित आहे का? शाहरुखने दिली Update

Choreographer Of Jawan: शाहरुखच्या ट्विटला उत्तर देताना त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या उत्स्फूर्त नृत्यावर प्रतिक्रिया दिल्या.

Pooja Dange

Choreographer Of Shah Rukh Khan Dance In Jawan: अॅटली दिग्दर्शित शाहरुखच्या जवान चित्रपटाची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. पॉवर-पॅक्ड जवान प्रिव्ह्यूमुळे प्रेक्षक अधिक आतुर झाले आहेत. अनेक अॅक्शन सीन्स, एक स्ट्रॉंग कथा आणि स्टार कास्टची झलक जवानच्या प्रिव्ह्यूमध्ये पाहायला मिळाली आहे. तर यामधील टक्कल असलेला शाहरुख खान मेट्रोमध्ये 'बेकारार कारके' या जुन्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. अभिनेत्याने स्वतःच हे कोरिओग्राफ केले आहे.

प्रिव्ह्यूमधील हा सीन मेट्रोच्या अपहरणाचा आहे आणि त्यात अनेक घाबरलेले प्रवासी दाखवले आहेत कारण शाहरुख विचित्र डान्स करत आहे. 1962 च्या बीस साल बाद या चित्रपटातील हेमंत कुमारच्या बेकरार करके हमे यूं ना जाइये या गाण्यावर शाहरुख खानने स्वतःच्या या डान्स स्टेप कोरिओग्राफ केल्या आहेत. (Latest Entertainment News)

शाहरुखला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या बॉल्ड लूकमध्ये पाहून सोशल मीडियावर अनेकांना आनंद झाला. तर मेट्रो हायजॅकच्या या सगळ्या राड्यात त्याच्या डान्स मूव्हची सर्वत्र चर्चा आहे.

जवान प्रिव्ह्यूला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर गेल्या आठवड्यात शाहरुखने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरवर आस्क मी एनीथिंग सत्र आयोजित केले.

एका चाहत्याने अभिनेत्याला विचारले, “#JawanPrevue मधील तुमचा आवडता क्षण कोणता. त्यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, बेकारार करके हमें यूं ना जाइये आपको हमारी कसम लौट आये.हे गाणे अॅटली यांची आयडिया होती. मला ते नृत्य आणि सर्व आवडते. मला वाटते त्या आयडिया खूप मॅजिकल आहे.'

शाहरुख खानच्या उत्स्फूर्त डान्सवर चाहत्यांची प्रतिक्रिया

शाहरुखच्या ट्विटला उत्तर देताना त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या उत्स्फूर्त नृत्यावर प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने लिहिले, "हेमंत कुमार आणि शकील बदुयानी यांनी कधीच कल्पना केली नसेल की शाहरुख या गाण्यात असे काही बदल करेल." जर त्याने पूर्ण गाण्यावर डान्स केला असता तर.

दुसऱ्याने विचारले, "गाणे कधी रिलीज होणार आहे?" त्याच्या बॉल्ड लूकवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, "सर तुमचा #Jawan मधील आवडता लूक." आणखी एकजण म्हणाला, "तुम्ही लाल रंगाच्या कपड्यात जास्त सुंदर दिसत आहात, "मेट्रोमध्ये नाचतानाचा सीन आवडला."

जवानमध्ये नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर, प्रियामणी आणि इतर अनेक कलाकार आहेत. 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

3 Idiots मधील 'मिलिमीटर' आठवतोय का? तुर्की पत्नीसोबत दिल्लीत दिसला, VIDEO होतोय व्हायरल

Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

SCROLL FOR NEXT