Gautami Patil  Saam TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: गौतमी पाटील कधी लग्न करणार?, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिलं उत्तर...

Gautami Patil Wedding: सर्वांची लाडकी गौतम पाटील लग्न कधी करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) निमित्ताने गौतमीने ती लग्न कधी करणार? या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.

Priya More

Gautami Patil Viral Video:

सबसे कातील म्हटलं की, तोंडून अपसूकच गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव ओठांवर येतं. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. गौतमी पाटीलची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते मोठी गर्दी करतात. सध्या गौतमी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम घेते.

गौतमी पाटीलची डिमांड इतकी वाढली आहे की, अगदी कोणाचा वाढदिवस असो, हळद असो, लग्न असो, बारसं असो सर्व कार्यक्रमाला तिला बोलावले जाते. अशामध्ये सर्वांची लाडकी गौतम पाटील लग्न कधी करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) निमित्ताने गौतमीने ती लग्न कधी करणार? या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.

गौतमी पाटील एका कार्यक्रमाला जात असताना पंढरपूरमध्ये आली होती. गौतमी पाटीलने आज विठ्ठल-रूक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर तिने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला. यावेळी गौतमी पाटीलला पत्रकारांनी लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. गौतमीचे चाहते ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यावर गौतमी आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सकारात्मक उत्तर देईल असे सर्वांना वाटत होते. पण गौतमीने तिच्या चाहत्यांची पुन्हा नाराजी केली. सध्या तरी आपला‌ लग्नाचा कोणताही विचार नसल्याचेही गौतमी पाटीलने यावेळी स्पष्टपणे सांगितले.

गौतमी पाटील सध्या तरुणाईंच्या गळ्यातली ताईत झाली आहे. गौतमी पाटीलची क्रेझ इतकी वाढली आहे की, सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग झाला आहे. गौतमी पाटील फक्त डान्स कार्यक्रम करत नाही तर काही दिवसांपूर्वी तिचा 'घुंगरू' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचसोबत गौतमी पाटील अनेक गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'दिलाचं पाखरू' आणि 'घोटाळा', 'चीझ लई कडक' ही गौतमी पाटीलची गाणी आतापर्यंत रिलीज झाली आहेत. प्रेक्षकांकडून या गाण्याला खूप चांगली पसंती मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

SCROLL FOR NEXT