Jaya Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan: हिंमत असेल तर समोर येऊन बोलून दाखवा, जया बच्चन पुन्हा एकदा ट्रोलर्सवर भडकल्या

Priya More

Jaya Bachchan Video:

बॉलिवूडच्या (Bollywood) ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या नेहमीच चर्चेत असतात. जया बच्चन या नेहमीच माध्यमांसोर येताना चिडत असतात. पापाराझींना अनेकदा त्या ओरडताना तुम्ही देखील पाहिले असेल. त्यांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. त्याचसोबत त्या अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत ज्या कोणत्याही विषयावर आपले मत स्पष्टपणे मांडतात. एखाद्या गोष्टीवर मत मांडताना त्या मागेपुढे पाहत नाही. स्पष्टवक्तेपणासाठी त्या खूपच चर्चेत असतात. यासाठी रोषाला सामोरे जावे लागले तरी चालेल पण त्या न घाबरता बोलताना दिसतात. जया बच्चन यांना नेटिझन्सनी अनेकदा ट्रोल देखील केले आहे. अशा ट्रोलर्सवर जया बच्चन भडकल्या आहेत. 'हिंमत असेल तर समोर येऊन बोलून दाखवा', असे त्यांनी ट्रोलर्सला खडसावून सांगितले आहे.

आता जया बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या मागचे कारण म्हणजे त्यांची नात नव्या नवेलीचा पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या' सीझन २ चा नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये नव्या आजी जया बच्चन आणि आई श्वेता यांच्यासोबत महिलांशी संबंधित समस्यांसह ट्रोलिंगबद्दल बोलताना दिसणार आहे. एखाद्याच्या सोशल मीडिया पोस्टवर लोकं बिनधास्तपणे कमेंट्स करत असतात. अशा नकारात्मक कमेंट्सबद्दल नव्याने आजीला प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना जया बच्चन यांनी ट्रोलर्सला चांगलेच फटकारले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन बोलून दाखवा, असं त्यांनी ट्रोलर्सला म्हटले आहे.

What The Hell Navya 2 च्या नवीन एपिसोडच्या प्रोमोमध्ये जेव्हा नव्याने नवेली आजीला सोशल मीडिया पोस्टवरील निगेटिव्ह कमेंट्सबद्दल विचारले. तेव्हा त्या म्हणतात की, कमेंट्स पॉझिटिव्ह पद्धतीने देखील केली जाऊ शकते.जया बच्चन म्हणाल्या की, 'तुम्हाला कमेंट करायची असेल तर पॉझिटिव्ह कमेंट करा. पण नाही, तुम्ही फक्त तुमचा निर्णय दिला आहे.' हे ऐकून नव्या नवेली नंदा म्हणते की, 'त्या लोकांना तुमच्यासमोर बसवले तर ते बोलू शकणार नाहीत, बरोबर?' यावर जया बच्चन म्हणतात की, 'बोलायची हिम्मत होईल का?' यावर नव्या हसते आणि पुढे म्हणते की, 'हो, तुझ्या समोर अजिबात होणार नाही.'

यावेळी जया बच्चन यांनी ट्रोल्सना खडसावले आणि हिंमत असेल तर खऱ्या गोष्टींवर बोला आणि चेहरा दाखवा, असे आव्हान दिले. जया बच्चन पुन्हा मीम्सबद्दल बोलल्या आणि म्हणाल्या की, 'हे ट्रोल मीम्सद्वारे वाईट विनोद करतात.' मग नव्याची आई श्वेता सांगते की, 'आजकाल लोक दु:खात आणि अडचणीत इतरांना पाहून आनंदी होऊ लागले आहेत. याला schadenfreude म्हणतात.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT