Jai Shree Ram Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jai Shree Ram Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? प्रविण तरडेंच्या 'जय श्री राम'मधून उलगडणार कहाणी

Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेवर आधारित 'जय श्री राम' मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. जाणून घ्या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्मिती संस्था आणि खासियत.

Shruti Vilas Kadam

Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारल्यानंतर पाकिस्तानमध्ये नेमकी कोणती घटना घडली होती? या घटनेमागचे सत्य काय आहे? या प्रश्नांची उत्तरे आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. कारण 'जय श्री राम' हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. वेगळा विषय, थरारक कथा आणि भव्य निर्मितीमूल्ये यामुळे या चित्रपटाची सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानमधील घटनेवर आधारित असणार चित्रपट

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची उभारणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये घडलेली एक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणार आहे. या घटनेमागील नेमकी कहाणी काय आहे, तिथे काय घडले होते आणि या घटनेचे कोणते पैलू प्रेक्षकांसमोर येणार, याबाबत सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे. 'जय श्री राम' या चित्रपटातून याच घटनेची मांडणी केली जाणार आहे.

दोन निर्मिती संस्थांची संयुक्त निर्मिती

'सेव्हन ओशन स्टुडिओज' आणि 'अमोल कागणे स्टुडिओ प्रॉडक्शन' यांच्या संयुक्त विद्यमाने 'जय श्री राम' या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राम खाटमोडे आणि सागर पाठक हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर विनोद वणवे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत. चित्रपटाच्या निर्मितीसाठी भव्य स्तरावर तयारी करण्यात आली आहे.

मराठी, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांची मांदियाळी

या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे यातील दमदार स्टारकास्ट. मराठी, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मात्र, चित्रपटातील कलाकारांची संपूर्ण यादी आणि त्यांच्या भूमिकांबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 'जय श्री राम' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून लवकरच तारिख जाहिर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; तपास यंत्रणा बदलण्यासाठी मुलगा राम पूर्णेकरांची उच्च न्यायालयात धाव

Maharashtra Politics: महायुतीत पुन्हा तणाव, शिंदेसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर

Gold Rate Today: दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं, १० तोळ्याच्या दरात ३२,२०० रुपयांची वाढ; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

ACB raid: झेडपीच्या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात सापडलं ५.१६ कोटींचं घबाड, एसीबीकडून २.५ किलो सोनं अन् ११.६ किलो चांदी जप्त

Sleep Hiccups : रात्री उचकी लागून झोपमोड होतेय? दुर्लक्ष करू नका! शरीर देतेय 'या' आजाराचे संकेत

SCROLL FOR NEXT