Vishakha Subhedar Kurrrr Drama Instagram
मनोरंजन बातम्या

Vishakha Subhedar Post: ‘काही पाखरं भरारी मारायला उडून गेली...’; ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकातून या कलाकारांची एक्झिट; विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत...

Vishakha Subhedar Kurrrr Drama: नाटकातून प्रसाद- नम्रताने अचानक एक्झिट घेतल्यानंतर तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने नाटकामध्ये काय बदल झाला आहे, हे सांगितले आहे.

Chetan Bodke

Vishakha Subhedar Kurrrr Drama

वेगवेगळ्या धाटणीतल्या अभिनयाकरिता विशाखा सुभेदारची विशेष ओळख आहे. मालिका, नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून विशाखा सुभेदारने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर विशाखा सुभेदार ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली.

विशाखा ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाची निर्माती असून तिने नाटकाबद्दल एक पोस्ट केली आहे. नाटकातून प्रसाद- नम्रताने अचानक एक्झिट घेतल्यानंतर तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने नाटकामध्ये काय बदल झाला आहे, हे सांगितले आहे. (Drama)

नेमकं नाटकातून प्रसाद- नम्रताने अचानक एक्झिट का घेतली?, याचं कारण अस्पष्ट आहे. “Show must go on... कलाकारांना उत्तम संधी मिळायलाच हवी... त्यांनी मोठं होणं हा कलेचा वारसा जपण्यासारखं आहे... पण तरीही एखादी कलाकृती तीच नशीब घेवून येते... बाकी आम्ही सगळे निम्मितमात्र. काही पाखरं भरारी मारायला उडून गेली... हरकत नाही पण show must go on... काही प्रिय मित्रांना हाक मारली, त्यांनी साथ दिली म्हणून प्रयोग सुरुळीत ठेवता येत आहेत.” (Marathi Film)

“माझ्या हाकेला धावून आलेला माझा मित्रसखा प्रियदर्शन जाधव आणि मैत्रसखी मयुरा रानडे! मित्रांनो तुमच्या साथीसाठी आभार आणि नाटकासाठी.., नाटक सुरु राहायला हवं म्हणून त्याची ही धडपड... हे वखाणण्याजोगी आहे. तर मंडळी हाच बदल आहे... नाटक.. कुर्रर्रर्रर्र कलाकार.. पॅडी कांबळे, प्रियदर्शन जाधव, मयुरा रानडे, विशाखा सुभेदार. आत्तापर्यंत तुम्ही नाटकावर प्रेम केलात त्याबद्दल तुमचे आभार... पण ह्यापुढे ही कायम सोबत रहा... नाटक बघायला या आणि बघीयल आवळा तरीही वेगळ्या संचाच नाटक बघायला या... खात्री आहे... नाटक जगवणाऱ्या कलाकारांचं कौतुक करायला नक्की याल.” (Social Media)

‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाला मराठी रंगभुमीवर चांगलाच प्रतिसाद मिळत असून नाटकाचे आतापर्यंत १०० हून जास्त प्रयोग झाले आहेत. विशाखाच्या ह्या नाटकाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT