Ranveer singh Don 3 Google
मनोरंजन बातम्या

Don 3 villain: रणवीर सिंगच्या 'डॉन ३' मध्ये 'या' अभिनेत्याची एंट्री; चित्रपटातून चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राईज

Don 3 : डॉन ३ बद्दल एक मोठी अपडेट आली आहे. रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी यांच्यानंतर आता एका नवीन खलनायकाची चित्रपटात एन्ट्री झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Don 3 villain: 'डॉन' आणि 'डॉन २' च्या प्रचंड यशानंतर, चाहते 'डॉन ३' च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. फरहान अख्तर दिग्दर्शित या अ‍ॅक्शन-पॅक्ड फ्रँचायझीमध्ये रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती पण पटकथेमुळे ती लांबणीवर पडली. मात्र, आता बातमी येत आहे की '12th फेल' फेम अभिनेता डॉन ३ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'डॉन ३' मध्ये 'हा' अभिनेता खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉन ३ मध्ये खलनायकाची भूमिका करण्यासाठी विक्रांत मेस्सीला साइन करण्यात आले आहे. "विक्रांत मेस्सी डॉन ३ मध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे." ही बातमी समोर येताच, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका नेटकाऱ्याने लिहिले, "या चित्रपटात शाहरुख खानने एक बेंचमार्क सेट केला आहे... आता विक्रांत मेस्सी त्याला कसा न्याय देऊ शकेल?" दुसऱ्या एका नेटकाऱ्याने लिहिले, "जर हे खरे असेल तर ही सगळ्यात वाईट डॉन फ्रँचायझ असेल." अजून एका नेटकाऱ्याने लिहिले, " आम्ही डॉन ३ च्या रिलीजची वाट पाहत आहे."

डॉन ३ चे शूटिंग कधी सुरू होईल?

दरम्यान, डॉन ३ मध्ये कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत आहे. या वर्षी शूटिंग सुरू होईल अशी शक्यता आहे. यापूर्वी असे वृत्त होते की शोभिता धुलिपालाची या चित्रपटात खास भूमिका असणार आहे.दरम्यान, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे.

टेलिव्हिजनवरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा आणि २००७ मध्ये 'धूम माचाओ धूम' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा विक्रांत मेसी शेवटचा 'द साबरमती रिपोर्ट' या राजकीय नाटकात दिसला होता. रंजन चंदेल दिग्दर्शित हा चित्रपट २००२ मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस ट्रेनला लागलेल्या आगीच्या घटनेवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराडमध्ये

Success Story: शिक्षणासाठी जमीन विकली, मोठ्या जिद्दीने UPSC केली क्रॅक ; IPS नुरूल हसन यांचा प्रवास

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

SCROLL FOR NEXT