Vijay Varma Upcoming Kaalkoot Trailer Out Instagram @itsvijayvarma
मनोरंजन बातम्या

Vijay Varma Web Series : सिरीयल किलर विजय वर्मा साकारणार पोलीस अधिकारी ; 'कालकूट'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Kaalkoot Trailer Released : विजय वर्मा जो या वेबसीरीजमध्ये रविशंकर त्रिपाठी हे पात्र साकारत आहे.

Pooja Dange

Vijay Varma Upcoming Kaalkoot Trailer Out : विजय वर्माचा नुतच लस्ट स्टोरीज २ मुले चर्चेत आला होता. तर आता त्याच्या नवीन वेबसीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरीजमध्ये विजय वारसम अनेक पोलीस उपनिरीक्षकाची भूमिका साकारत आहे.

श्वेता त्रिपाठीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामागील गुन्हेगारांना शोधण्यासाठी विजय वर्मा सर्वतोपरी प्रयत्न करताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. जिओसिनेमाच्या आगामी वेबसीरीज 'कालकूट'मध्ये वास्तविकतेचे चित्रण करण्यात आले आहे. (Latest Entertainment News)

'कालकूट' ट्रेलर

या वेबसीरीजच्या ट्रेलरची सुरुवात पोलीस स्टेशनपासून होते. विजय वर्मा जो या वेबसीरीजमध्ये रविशंकर त्रिपाठी हे पात्र साकारत आहे. विजय वर्मा त्याच्या पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देतो.

परंतु त्याचे सिनिअर त्याच राजीनामा स्वीकारत नाहीत आणि त्याच्यासमोर एक अट ठेवतात. जेव्हा विजय वर्मा एखादी एफआयआर नोंदवले तेव्हा त्याच्या राजीनाम्याचा विचार केला जाईल, असे त्याला त्याचे सिनिअर सांगतात. त्यानंतर विजय वर्माकडे ऍसिड हल्ल्याची केस येते. ज्या मुलीवर हा हल्ला झालेला असतो त्यामुलीशी त्याची आई त्याच लग्न ठरवणार असते.

हे कळल्यानंतर विजय वर्मा व्यवस्थेच्या विरोधात जात या केसाचा तपास सुरू करतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये विजय वर्माचा केसचा तपास करतानाची प्रवास दाखवला आहे.

'कालकूट' 27 जुलैपासून JioCinema वर प्रसारित होणार आहे.

'कालकूट'ची कथा

'कालकूट'चा दोन मिनिटे-आठ-सेकंदचा ट्रेलर एका छोट्या शहरातील भयानक अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या वेबसीरीजची कथा एक बेफिकीर पोलीस उपनिरीक्षक रविशंकर त्रिपाठीभोवती फिरते.

जेव्हा त्याला कळले की क्रूर हल्ल्याची बळी पडलेली मुलगी तीच आहे ज्याच्याशी त्याच्या आईला त्याचे लग्न लावायचे होते. एका नवीन उद्देशाने प्रेरित होऊन, रवीने गुन्ह्याचा तपास करतो आणि गुन्हेगारांना शोधण्याचे काम स्वतःवर घेतो. तथापि, समाजात पूर्वाग्रह आणि दडपशाहीमुळे हे त्याला सुरुवातीला कठीण जाते.

सुमित सक्सेना दिग्दर्शित या वेबसीरीजमध्ये श्वेता त्रिपाठी शर्मा, यशपाल शर्मा, गोपाल दत्त आणि सीमा बिस्वास यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. श्वेता त्रिपाठी शर्मा, या वेबसीरीजमध्ये अॅसिड हल्ल्यातील पीडितेची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :जामनेर मध्ये मतमोजणी थांबवली

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT