Vijay-Rashmika Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay-Rashmika Wedding: 'मी माझ्या बेस्टफ्रेंडला माझी बायको...'; लग्नानंतर विजयने रश्मिकासाठी लिहिला खास मेसेज

Vijay Rashmika Wedding: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न झालं आहे. त्यांनी लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. विजयने आता रश्मिकासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये एक खास मेसेज त्याने लिहीला आहे.

Shruti Vilas Kadam

Vijay Rashmika Wedding: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना लग्नबंधनात अडकले आहेत. उदयपूरला थाटामाटात झालेल्या लग्नानंतर दोघांनीही आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. पण, हे फोटो त्यांनी ते एकत्र पोस्ट केलेले नाहीत, तर वेगळे पोस्ट केले आणि एकमेकांसाठी खास पोस्ट लिहिली आहेत. रश्मिकाने विजयची ओळख 'तिचा नवरा' म्हणून करून दिली आहे. तर, विजयने रश्मिकासाठी खास पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्याने मी माझ्या बेस्टफ्रेंडला माझी बायको बनवले असे लिहिले आहे.

विजयने फोटो शेअर करत लिहिले...

विजय आणि रश्मिकाने पहिला फोटो सारखाच शेअर केला, पण त्यानंतरचे फोटो वेगळे आहेत. एका फोटोंमध्ये, दोघेही एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये रश्मिकाचा चेहरा दिसत आहे, विजय तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालत आहे आणि अभिनेत्रीचे डोळे अश्रूंनी भरलेले आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये, दोघे एकमेकांना मिठी मारत आहेत. आणखी एका फोटोमध्ये, ते एकत्र चालत आहेत, तर सर्वजण त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. आणखी एका फोटोमध्ये, रश्मिका हलक्या नारंगी रंगाची साडी आणि भरपूर दागिने घालून मंडपाकडे चालत येताना दिसत आहे.

रश्मिकासाठी विजयचा खास मेसेज

फोटो शेअर करताना विजयने लिहिले, "एक दिवस मला तिची खूप आठवण येत होती. मला तिची इतकी आठवण येत होती की मला जाणवले की ती आजूबाजूला असती तर माझा दिवस चांगला असता. जसे की ती माझ्यासोबत असती तर माझे जेवण चांगलं झालं असतं. जर ती माझ्यासोबत असती तर माझे वर्कआउट्स अधिक गंमतीशीर झालं असतं. मला तिची गरज आहे. मी कुठेही असलो तरी ती माझ्यासाठी माझं घर आहे. म्हणून मी माझ्या बेस्टफ्रेंडला माझी बायको बनवले. २६.२.२०२६."

दोन विधींमध्ये लग्न

विजय आणि रश्मिकाचे लग्न दोन विधींमध्ये झालं. प्रथम, त्यांनी सकाळी तेलुगू पद्धतीनुसार आणि नंतर संध्याकाळी कोडावा पद्धतीनुसार लग्न केले. दोघांनी लग्नापूर्वीच्या प्रत्येक समारंभाचे आणि कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. माहितीनुसार, उदयपूरमधील लग्नानंतर, दोघेही आता त्यांच्या इंडस्ट्री मित्रांसाठी हैदराबादमध्ये रिसेप्शन आयोजित करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT