vijay deverakonda and ananya pandey Instagram/@ananyapanday
मनोरंजन बातम्या

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे पोहोचले पंजाबच्या शेतात; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

'लायगर' चित्रपटातील अभिनेत्री अनन्याने इन्स्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा बहुप्रतिक्षित 'लायगर' चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी काही दिवसच राहिले आहेत. अलिकडेच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटातील अभिनेत्री अनन्याने इन्स्टाग्रामवरून (Instagram) काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. (vijay deverakonda And Ananya Panday News )

अनन्याने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटातील काही फोटो शेअर केले आहेत. तिने केलेल्या पोस्टमध्ये 'कोका २.०' लवकरच चित्रपटातील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असं कॅप्शन दिलं आहे. आणखी एका पोस्टमध्ये तिने 'प्यार होता है दिवाना सनम' असं कॅप्शन दिलं आहे. अनन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये विजय आणि अनन्या ट्रॅक्टरमध्ये बसलेले दिसत आहेत. विजय आणि अनन्याचे हे फोटो त्याच्या चाहत्यांना आवडले आहेत. चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर लाईक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे दोघेही सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. अलीकडेच कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुबंईतील ट्रेनने प्रवास केला होता. आता पुन्हा विजय आणि अनन्या नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी थेट चंदीगढला गेले आहेत. गाण्याच्या प्रमोशनसाठी त्यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मधील सिन रिक्रिएट केलं. त्या दोघांनी पंजाबमधील शेतांमध्ये ट्रॅक्टरमध्ये चित्रपटातील नवीन गाण्याचे प्रमोशन केले आहे.

दरम्यान, 'लायगर' हा एक स्पोर्टस अॅक्शन ड्रामा आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून करण जौहर चित्रपटाचा निर्माता आहे. चित्रपटातून विजय देवरकोंडा बॅालिवूडमध्ये तर अनन्या ही टॅालीवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यांचा बहुभाषिक चित्रपट हा २५ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT