Vijay Antony Shared Statement After Daughter's Death Instagram
मनोरंजन बातम्या

Vijay Antony Shared Emotional Post: ‘तिच्यासोबत माझाही मृत्यू झाला...’; मुलीच्या आत्महत्येनंतर विजय अँटोनीची भावुक पोस्ट

Vijay Antony Emotional Post: लेकीच्या निधनानंतर विजय अँटनीने पहिल्यांदाच भावना शेअर केल्या आहेत.

Chetan Bodke

Vijay Antony Shared Statement After Daughter's Death

सुप्रसिद्ध तमिळ संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीच्या मुलीने १९ सप्टेंबर रोजी पहाटे आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले. अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर येताच सिनेसृष्टीमध्ये खळबळ उडाली होती. अभिनेत्याच्या मुलीने मंगळवारी सकाळी त्यांच्या चेन्नईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. घरातल्या मदतनीसाला अभिनेत्याची मुलगी मृतावस्थेत आढळून आली होती. पण अद्याप आत्महत्येमागील कारण समोर आलेलं नाही, सध्या चेन्नई पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. लेकीच्या निधनानंतर विजय अँटनीने पहिल्यांदाच भावना शेअर केल्या आहेत.

अभिनेत्याने आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. अभिनेता आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “प्रिय मित्रांनो, माझी मुलगी मीरा खूपच प्रेमळ आणि धाडसी होती. ती आता धर्म, जात, पैसा, मोह- मत्सर, वेदना, दारिद्र्य आणि सूडाची भावना या सर्वांपासून मुक्त आणि सर्वाधिक शांत ठिकाणी गेली आहे. ती अजूनही माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते. फक्त तिचाच नाही तर, माझा सुद्धा मृत्यू झाला आहे. आता सध्या मी तिच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली आहे. यापुढे मी तिच्या नावाने सर्व चांगल्या गोष्टी करेल, त्याची सुरुवात तिच्याकडून करेल, आपलाच प्रिय विजय अँटनी.”

लेकीच्या निधनानंतर अभिनेता विजयने शेअर केलेली लिंक सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही कमेंटच्या माध्यमातून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या’, ‘तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात, याची आम्हाला कल्पनाही करता येत नाही, तुम्ही खंबीर राहा’, अशा अनेक धीर देणाऱ्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (Actor)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या मुलीने चेन्नईतील राहत्या घरी गळफास घेतला होता. पहाटे ३ वाजता विजय यांची मुलगी त्यांच्या घरी असलेल्या मदतनीसाला मृतावस्थेत आढळून आली होती. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचाराआधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

विजयची मुलगी चेन्नईतल्या एका प्रसिद्ध शाळेत शिक्षण घेत होती. रिपोर्ट्सनुसार, ती तणावाखाली होती आणि त्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते. अभिनेत्याच्या परिवाराबद्दल सांगायचे झाल्यास पत्नी फातिमा असून त्यांना दोन मुली आहेत. विजय अँटोनी टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याचं स्वत: चं प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT