Vidya Balan Upcoming Movie Trailer Out : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारत असते. विद्याने 'डर्टी पिक्चर', 'कहानी' सारखे अनेक हिट चित्रपट तिच्या फिल्मी करियरमध्ये दिले आहेत.
सध्या विद्या बालन तिच्या आगामी 'नियात' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे विद्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विद्याच्या या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. ‘नियात’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
विद्या बालनच्या 'नीयत' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या विविध छटा पाहायला मिळत आहेत. अचानक असे काहीतरी घडते ज्यामुळे प्रत्येकाचे आयुष्य बदलून जाते. (Latest Entertainment News)
ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे की, राम कपूर आत्महत्या करतो, पण त्याच दरम्यान विद्या बाल येते आणि ती आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगते. त्यानंतरच चित्रपटात सत्याचा शोध सुरू होतो. 'नीयत 'चा ट्रेलर खूपच रंजक आहे. त्याचबरोबर विद्याचा अभिनयही नेहमीप्रमाणे दमदार आहे.
अनु मेनन दिग्दर्शित 'नीयत' हा चित्रपट सस्पेन्सने भरलेला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. युजर्स कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटात विद्या बालनने गुप्तहेर मीरा रावची भूमिका साकारली आहे. तर, मीरा या चित्रपटात एका हत्येचे गूढ उकलताना दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात होता, त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली होती. त्याचबरोबर आता या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. 'नीयत' चित्रपटाचे शूटिंग यूकेमध्ये झाले आहे. विद्याशिवाय या चित्रपटात राम कपूर आणि राहुल बोस यांचा अभिनयही पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट ७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.