Vicky Kaushal Reaction On Salman Khan Saam TV
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal Reaction On Salman Khan : 'कधी-कधी दिसत तसं नसतं' सलमान खानच्या व्हायरल व्हिडिओवर विकी कैशलने दिली प्रतिक्रिया

Vicky Kaushal At IIFA Press Conference : सलमान खानच्या सुरक्षारक्षकांनी विकी कौशलला धक्का देत बाजूला केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Pooja Dange

Vicky Kaushal Reaction On Viral Video : बॉलिवूड कलाकार सध्या आयफामध्ये सहभागी होण्यासाठी अबुधाबीमध्ये गेले आहेत. या पुरस्कार सोहळ्यात भाईजान सलमान खानही सहभागी झाला होता. सलमान खान त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाचे शूटिंग अबुधाबीमध्ये करत आहे आणि त्यात तो व्यस्त आहे. त्याच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून सलमान आयफामध्ये सहभागी झाला होता.

दरम्यान विकी कौशल आणि अभिषेक बच्चन हे आयफा होस्ट करत आहेत. या कार्यक्रमापूर्वी एका व्हिडिओची काल दिवसभर खूप चर्चा झाली होती. सलमान खानच्या सुरक्षारक्षकांनी विकी कौशलला धक्का देत बाजूला केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, नेटकऱ्यांना सलमानच्या सुरक्षारक्षकांचे हे वागणे अजिबात आवडले नाही. आता या व्हिडिओवर विकी कौशलची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Latest Entertainment News)

मीडियाशी बोलताना विकी कौशल म्हणाला, "कधीकधी गोष्टी व्हिडिओमध्ये दिसतात त्याप्रमाणे नसतात." विकीच्या म्हणण्यानुसार, कधीकधी गोष्टी वाढतात. अनेकवेळा विनाकारण त्याच्याबद्दल चर्चा होते. त्याचा काही उपयोग नाही. अनेकवेळा व्हिडीओमध्ये जे दिसते तसेच घडत नसते. त्यामुळे त्यावर बोलून उपयोग नाही. विकीच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की व्हिडिओमध्ये जे दिसले ते तसे घडलेले नाही.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, आयफा पुरस्कार सोहळा संपल्यानंतर ग्रीन कार्पेटवर सलमान खान स्वतः विकी कौशलकडे गेला आणि त्याला मिठी मारली आणि सर्व अफवांना पूर्णविराम दिला.

विकी कौशलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तो लवकरच सारा अली खानसोबत त्याचा आगामी चित्रपट 'जरा हटके जरा बचके' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तर सलमान खान 'टायगर 3' घेऊन दिवाळीत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सलमान खानच्या टायगर 3 बाबत लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. सलमान आणि कतरिना कैफसोबत इमरान हाश्मी देखील टायगर 3 मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT