बॉलिवूड अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा सध्या 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) जोरदार चर्चेत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादुर' १ डिसेंबर २०२३ ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
रिलीजआधीपासून चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच क्रिकेटर सचिन तेंडुलकरने विकी कौशलचा 'सॅम बहादुर'चा पाहिला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर विकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकरला हा चित्रपट कसा वाटला याची प्रतिक्रिया दिली आहे. (Bollywood)
नुकतंच 'सॅम बहादुर'च्या निर्मात्यांनी स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. या स्पेशल स्क्रिनिंगला सचिन तेंडुलकरने हजेरी लावली होती. यावेळी अंजली तेंडुलकरनेही हजेरी लावली होती. चित्रपट पाहिल्यानंतर सचिनने फक्त निर्मात्यांचेच नाही तर, दिग्दर्शकांचे आणि विकीचे कौतुक केले.
“विकी कौशलचा 'सॅम बहादुर' खूप सुंदर चित्रपट आहे. मी विकीचा अभिनय पाहून प्रभावित झालोय. चित्रपट पाहताना मला फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांनाच पाहत असल्याचे जाणवली.”
“विकी कौशलला रुपेरी पडद्यावर पाहताना, त्याचे काम खूपच अविश्वसनीय होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वच पिढ्यांमध्ये, देशाच्या इतिहासाबद्दल जागरुकता निर्माण होईल.” असं चित्रपट पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला आहे. विकीने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये, विकी आणि सचिन दोघेही एकत्र दिसत आहेत. “माझ्या बालपणापासून असलेल्या हिरोने आज माझा 'सॅम बहादुर' चित्रपट पाहिला. #IAmOk !!! धन्यवाद सचिन तेंडुलकर सर... तुम्ही केलेल्या कौतुकाचे मी खूप आभारी आहे.” अशा शब्दामध्ये कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. (Social Media)
चित्रपटाबद्दल सांगायचे तर, मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ १ डिसेंबर २०२३ ला रिलीज झाला आहे. चित्रपटाने दोन दिवसात एकट्या भारतात १५.२५ कोटींची कमाई केली आहे. तर संपूर्ण जगभरामध्ये चित्रपटाने १९ कोटींची कमाई केली आहे. ५५ कोटींमध्ये निर्मित झालेल्या ह्या चित्रपटासाठी दिग्दर्शकांसह निर्मात्यांनीही विशेष मेहनत घेतली आहे. भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची कथा आहे. चित्रपटामध्ये विकी कौशल सह फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी सारखे प्रतिभावान कलाकार चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.