Chhava Movie Record saam tv
मनोरंजन बातम्या

Chhava Movie Record: बाहुबली 2 च्या वेगात विकीचा 'छावा'; 6 दिवसात छावा चित्रपटाने रचला इतिहास

Chhava Movie Record: विकी कौशलच्या छावा चित्रपटाने नवा विक्रम रचलाय. छावा चित्रपटाने नेमकी किती कमाई केलीय आणि कोणत्या चित्रपटाप्रमाणे छावाची घोडदौड सुरु आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गर्जना करतोय.. चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेत. मात्र आता छावाने थेट बाहुबली 2 या चित्रपटाच्या कमाईशी स्पर्धा सुरु केलीय.मात्र आतापर्यंत कोणत्या चित्रपटांनी 200 कोटींचा टप्पा पार करत रेकॉर्ड रचलाय? पाहूयात.

'छावा'ची रेकॉर्डब्रेक झेप

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'- 3 दिवसात 200 कोटींचा टप्पा पार

जवान, अॅनिमल, पठान- 4 दिवसात 200 कोटींची कमाई

गदर 2 आणि स्त्री 2 - 5 दिवसात 200 कोटी

बाहुबली 2 - 6 दिवसात 200 कोटी

अभिनेता विकी कौशलच्या छावाने पहिल्याच दिवशी 33 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर वर्किंग डे चा छावाच्या कमाईवर कोणताच परिणाम दिसला नाही. सहाव्या दिवशीही छावाच्या कमाईची घोडदौड कायम आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी चित्रपट असल्याने छावा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात येत असतानाच.. राज्यात 2017 पासून करमणूक करच नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

बाहुबली 2 चित्रपटाने 1400 कोटींच्या कमाईचं उड्डाण घेतलं होतं. आता त्याच वेगाने छावा चित्रपट गर्जना करत झेप घेतोय.. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT