Veteran Telugu film actor and producer G V Narayana Rao has passed away  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी तारा निखळला; ज्येष्ठ अभिनेत्याचे दीर्घ आजाराने निधन

Famous Actor Death: तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते जी. व्ही. नारायण राव यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.

Shruti Vilas Kadam

Famous Actor Death: तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते जी. व्ही. नारायण राव यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले. बुधवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही काळापासून ते प्रकृतीशी संबंधित समस्यांशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला असून, अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. ‘मुव्ही आर्टिस्ट असोसिएशन’नेही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

जी. व्ही. नारायण राव यांचा जन्म कृष्णा जिल्ह्यातील कुरुमड्डाली गावात झाला. त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. १९७६ मध्ये दिग्गज दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या ‘अंथुलेनी कथा’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा नंदी पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी ‘मुत्याला पल्लाकी’, ‘ओका ऊरी कथा’, ‘चिलकम्मा चेप्पिंडी’ आणि ‘ऊरुकिचिना माता’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

चिरंजीवी आणि रजनीकांत यांच्याशी खास मैत्री

जी. व्ही. नारायण राव यांचे सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध होते. चेन्नईतील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दोघे एकाच बॅचचे विद्यार्थी होते. अभिनयाचे प्रशिक्षण घेत असतानाच त्यांची मैत्री झाली. तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांच्याशीही त्यांची घनिष्ठ मैत्री होती. दोघांनी ‘चट्टानिकी कल्लू लेवू’, ‘मंचू पल्लाकी’, ‘राजा विक्रमार्का’, ‘गँग लीडर’ आणि ‘हिटलर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

निर्माता म्हणूनही यशस्वी कारकीर्द

अभिनयासोबतच जी. व्ही. नारायण राव यांनी निर्मिती क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले. त्यांनी चिरंजीवी यांच्या ‘देवान्तकुडू’ आणि ‘यमूडिकी मोगुडू’ या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. ‘यमूडिकी मोगुडू’च्या तमिळ रिमेकची निर्मितीही त्यांनी केली होती. या चित्रपटात रजनीकांत यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

टेलिव्हिजन क्षेत्रातही ते सक्रिय होते. ‘पासुपू कुमकुमा’ आणि ‘सुंदरकांडा’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. अभिनय, निर्मिती आणि टेलिव्हिजन अशा विविध माध्यमांत योगदान देणाऱ्या जी. व्ही. नारायण राव यांच्या निधनाने तेलुगू मनोरंजनसृष्टीने एक अनुभवी कलाकार आणि निर्माता गमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मागण्या मान्य होऊनही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, उपोषणाचा १५ वा दिवस

Nanded News: तरुणाने आयुष्य संपवलं, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार करत सांगितलं कारण

Ginger Benefits : ६० दिवस रोज चावून खा आल्याचा छोटा तुकडा, शरीराला मिळतील हे 5 चमत्कारी फायदे

Crime: अल्पवयीन भाचीवर मानलेल्या मामाकडून बलात्कार, अंबरनाथ हादरले

Nepal floods: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 80 पर्यटक अडकले, सरकारकडून संपर्क करण्याचे प्रयत्न पण...; गिरीश महाजनांनी दिली महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT