Screenwriter Sri Ramana Age Of 70 Dies Twitter
मनोरंजन बातम्या

Veteran Screenwriter Sri Ramana Dies: प्रख्यात पटकथा लेखक काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७० व्या वर्षी दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली

Screenwriter Sri Ramana Age Of 70 Dies: दाक्षिणात्य चित्रपट प्रख्यात पटकथा लेखक श्री रमण यांचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

Screenwriter Sri Ramana Passes Away: दाक्षिणात्य चित्रपट प्रख्यात पटकथा लेखक श्री रमण यांचे निधन झाले आहे. त्यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. रमण यांनी आपल्या दमदार लेखणीने भारतीय सिनेसृष्टीत दमदार छाप सोडली.

रमण यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसोबतच त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. रमण यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तेलुगू चित्रपट आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात रमण यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांची ओळख कायम आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९ जुलै रोजी प्रख्यात पटकथा लेखक श्री रमण यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या कामांमध्ये 'मिथुनम' (2012) या सिनेमाची पटकथा समाविष्ट आहे. या सिनेमाच्या पटकथेसाठी त्यांची विशेष ओळख आहे. (Tollywood)

गायक-अभिनेते एसपी बालसुब्रमण्यम आणि लक्ष्मी अभिनीत रोमँटिक ड्रामा चित्रपट याच नावाच्या रामन यांच्या कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला नंदी पुरस्कारही मिळाला होता. (Entertainment News)

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात श्री रमण यांचा जन्म झाला असून एका साप्ताहिक मासिकेतील त्यांच्या आकर्षक आणि प्रभावी लेखांमुळे त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती. आपल्या दमदार लेखणीने त्यांनी वाचकांना समृद्ध केले. अक्षरा थुनिराम या टोपणनावाने श्री रमण यांची टॉलिवूडमध्ये ओळख होती. आपल्या अष्टपैलुत्वाचे प्रदर्शन करताना त्यांनी अनेक मासिकांमध्ये व्यंगचित्रे लिहिली. 'जोक्की ज्योती', 'श्री वाहिनी', 'पंढरी' आणि 'मोगली रेकुलू' यांसारख्या अनेक उल्लेखनीय कलाकृती त्यांनी लिहिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT