Veteran director Singeetham Srinivasa Rao passed away Saaam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Director Death: ज्येष्ठ प्रयोगशील दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Director Death: ज्येष्ठ दिग्दर्शक सिंगितम श्रीनिवास राव यांचे चेन्नईत निधन झाले. Jr NTR यांच्यासह अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. ‘पुष्पक विमान’ आणि ‘आदित्य 369’मधून त्यांनी भारतीय सिनेमाला दिलेले योगदान जाणून घ्या.

Shruti Vilas Kadam

Famous Director Death: भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रयोगशील दिग्दर्शक सिंगितम श्रीनिवास राव यांचे शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी चेन्नईतील रुग्णालयात निधन झाले. वयाच्या९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रयोगशील पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

Jr NTRने वाहिली श्रद्धांजली

सिंगितम श्रीनिवास राव यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर अभिनेता ज्युनियर एनटीआर ने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. राव यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या चित्रपटांचा आणि सिनेमाविषयीच्या दृष्टिकोनाचा अनेक कलाकारांवर प्रभाव राहिला आहे. असे त्यांने लिहिले.

प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून ओळख

सिंगितम श्रीनिवास राव यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांवर काम केले. विज्ञानकथा, फँटसी, विनोद, सामाजिक विषय, व्यंगचित्रपट आणि पौराणिक कथांसह अनेक शैली त्यांनी हाताळल्या. पारंपरिक चौकटींपलीकडे जाऊन नवीन प्रयोग करण्यासाठी ते विशेष ओळखले जात होते.

‘पुष्पक विमान’ने गाजवला इतिहास

त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी ‘पुष्पक विमान’ हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. चित्रपटात एकही संवाद नसतानाही कथा आणि अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या या चित्रपटाने भारतीय सिनेमात वेगळा ठसा उमटवला. कमल हासन यांच्यासोबतची त्यांची जोडीही विशेष गाजली. ‘अपूर्व सहोदरांगल’, ‘मायकेल मदना कामराजन’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांच्या दिग्दर्शनातील वेगळेपणा दिसून आला.

‘आदित्य 369’ महत्वाचा चित्रपट

‘आदित्य 369’ हा सिंगितम श्रीनिवास राव यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा चित्रपट. टाइम ट्रॅव्हल आणि विज्ञानकथेचा विषय त्यांनी या चित्रपटातून वेगळ्या पद्धतीने मांडला. तेलुगू सिनेमात विज्ञानकथा आणि टाइम ट्रॅव्हलच्या संकल्पनेला लोकप्रिय करण्यामध्ये या चित्रपटाचे मोठे योगदान आहे.

सात दशकांहून अधिक काळ सिनेमासाठी योगदान

सिंगितम श्रीनिवास राव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ज्येष्ठ दिग्दर्शक के. व्ही. रेड्डी यांच्याकडे सहाय्यक म्हणून केली. १९७२ मध्ये ‘नीती निजायती’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये त्यांनी काम केले. त्यांच्या नावावर राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक सन्मान आहेत. प्रयोगशीलता, कल्पकता आणि वेगळ्या विषयांना पडद्यावर साकारण्याची क्षमता असलेल्या सिंगितम श्रीनिवास राव यांचे नाव भारतीय सिनेमाच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला संपवलं, भरचौकात ४ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO समोर

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

SCROLL FOR NEXT