Veteran art director and production designer K Shekhar passed away Saam tv
मनोरंजन बातम्या

Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्यावर, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

Director Death: सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आर्ट डायरेक्टर व प्रॉडक्शन डिझायनर के. शेखर यांचे 72 व्या वर्षी निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Director Death: ज्येष्ठ कला दिग्दर्शक के. शेखर यांचे 72 वर्षांच्या वयात निधन झाले आहे. तिरुवनंतपुरम येथील राहत्या घरी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. . शेखर यांच्या निधनाने मलयाळम चित्रपटसृष्टी आणि सर्वचित्रपटप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.

के. शेखर हे भारतीय सिनेचं जगतात एक प्रतिष्ठित व नावाजलेले नाव होते. ते मुख्यतः कला दिग्दर्शक (Art Director) आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणून ओळखले जात. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांसाठी नाविन्यपूर्ण सेट डिझाइन तयार केले. यामुळे त्यांनी चित्रपटांमध्ये कथानक आणि दृश्यांचा अनुभव अधिक प्रभावी केला.

त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात उल्लेखनीय कामांपैकी एक म्हणजे भारताची पहिली 3D फीचर फिल्म “माय डियर कुट्टीचाथन” (1984) साठीचे सेट्स. या चित्रपटातील प्रसिद्ध अँटी-ग्रॅव्हिटी/फिरणाऱ्या खोलीच्या दृश्याची संकल्पना आणि रचना ही त्यांची खास कलाकृती होती. या खोलीच्या सेटमध्ये कॅमेरा स्थिर ठेवून संपूर्ण खोली फिरवली जाई आणि त्यामुळे कलाकार हवेत तरंगत असल्याचा भास निर्माण होत असे हे तंत्र 1980च्या दशकात अत्यंत अभिनव मानलं जायचं.

शेखर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1980 साली केली. त्यांच्या करिअरची सुरुवात “Padayottam” या पहिल्या 70 mm मलयाळम चित्रपटात कॉस्ट्यूम आणि पब्लिसिटी डिझायनर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी “नोक्केथा दूरथ कन्नूम नट्टू", "ओन्नू मुथल पूज्यम वारे", "चाणक्य” यांसारख्या चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन केले. त्यांच्या सूक्ष्म आणि कल्पनाशील सेट डिझाइनमुळे या चित्रपटांचे दृश्यमान वातावरण अधिक स्मरणीय बनले.

के. शेखर हे केवळ मलयाळम सृष्टीमध्येच नव्हे, तर भारतीय सिनेसृष्टीमध्ये कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून ओळखले गेले. त्यांच्या कामाचा प्रभाव आजही अनेक नवोदित आर्ट डायरेक्टर्स आणि सिनेकारांमध्ये दिसून येतो. त्यांच्या निधनाने चित्रपटविश्वात एक मोठा कलाकार हरवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Web Update: WhatsApp झालं पुन्हा अपडेट; व्हॉइस-व्हिडिओ कॉलसाठी घेतलं महत्त्वाचा निर्णय

Ind Vs Nz: पहिल्या टी-२० साठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११; या खेळाडूंना मिळणार संधी

Maharashtra Live News Update: बदलापूरमध्ये भूमाफियांकडून सर्रासपणे डोंगर खोदण्याचं काम सुरू

KDMC Politics: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत राजकीय उलथापालथ, मनसेच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचा महापौर होणार?

Shiv Sena : पुन्हा तारीख पे तारीख; शिवसेना कुणाची? आता या दिवशी होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT