Tinu Anand Health Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tinu Anand Health Update: ५ बरगड्या फ्रॅक्चर, फुफ्फुसाला दुखापत; ज्येष्ठ अभिनेते रुग्णालायात दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Tinu Anand Health Update: ज्येष्ठ अभिनेते टीनू आनंद यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पाच ठिकाणी बरगड्या फ्रॅक्चर आणि फुफ्फुसाला दुखापत झाल्यानंतर सध्या ते घरी उपचार घेत आहेत.

Shruti Vilas Kadam

Tinu Anand Health Update: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते टीनू आनंद यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गंभीर दुखापतीमुळे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या टीनू आनंद यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या बरगड्यांना पाच ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. त्यापैकी एका फ्रॅक्चरमुळे त्यांच्या फुफ्फुसालाही दुखापत झाली होती. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात (ICU)मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते घरी परतले आहेत.

टीनू आनंद यांची प्रकृती कशी आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून घरी परतल्यानंतर टीनू आनंद सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पूर्णपणे बरे होईपर्यंत घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी घरीच फिजिओथेरपी केली जात आहे. बरगड्यांना झालेल्या फ्रॅक्चरमुळे त्यांना दैनंदिन कामे करतानाही त्रास होत आहे. अंथरुणातून उठणे, सरळ बसणे किंवा कुशीवर वळणे यांसारख्या साध्या हालचाली करतानाही त्यांना वेदना होत आहेत. त्यामुळे सध्या ते विश्रांती घेत आहेत. दरम्यान, त्यांना नेमकी दुखापत कशी आणि कुठे झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

प्रलंबित डबिंग कामासाठी निर्मात्यांचा संपर्क

टीनू आनंद यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच काही चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांच्या काही चित्रपटांचे डबिंगचे काम अद्याप बाकी आहे. चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जवळ येत असल्याने निर्मात्यांना हे काम लवकर पूर्ण करायचे आहे. मात्र, सध्या टीनू आनंद यांना बोलतानाही त्रास होत आहे. बरगड्या आणि फुफ्फुसाला झालेल्या दुखापतीमुळे त्यांच्यासाठी डबिंग करणे कठीण ठरत आहे. त्यामुळे ते पुन्हा कधी काम सुरू करणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय

टीनू आनंद यांनी आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. अलीकडेच ते 'पड्डी' या चित्रपटामुळे चर्चेत होते. या चित्रपटात राम चरण आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. आता टीनू आनंद यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी समोर आल्यानंतर त्यांचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील सहकारी त्यांच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण अपघात! ट्रक आणि मिनीबसची जोरदार धडक; १६ जणांचा मृत्यू

Weather Update: पुन्हा चक्रीवादळाचे संकट! 19-20 नोव्हेंबरला वादळ धडकणार; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट

Winter Beauty Tips : थंडीत चेहरा काळवंडतोय? त्वचेचा नैसर्गिक सुंदरता टिकवण्यासाठी करा या गोष्टी

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये बेकायदेशीर कोळसा डेपोविरोधात नागरिक आक्रमक

Fake Milk: डिटर्जेंट आहे की दूध; दुधाची शुद्धता कसं ओळखाल?

SCROLL FOR NEXT