Actor in Old Age Home Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor in Old Age Home: १०० चित्रपटात काम केलं; पण आज अभिनेत्याकडे औषधांसाठीही पैसे नाहीत, वृद्धाश्रमात काढतायेत दिवस

Actor in Old Age Home: दक्षिण भारतीय ज्येष्ठ अभिनेते मोहन शर्मा सध्या वृद्धाश्रमात राहत असून औषधांसाठीही पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. रजनीकांत यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

Shruti Vilas Kadam

Actor in Old Age Home: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मोहन शर्मा यांनी आपल्या आयुष्यातील कठीण वास्तव उघड केले आहे. एकेकाळी चेन्नईतील पॉश 'पोएस गार्डन' परिसरातील आलिशान घरात राहणारे मोहन शर्मा आज वृद्धाश्रमात राहण्यास मजबूर झाले आहेत. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांच्याकडे औषधोपचारासाठीही पुरेसे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

केरळमधील पालक्काड येथे जन्मलेल्या मोहन शर्मा यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून अभिनयाचे शिक्षण घेतले. या संस्थेतून पदवी मिळवणारे ते पहिले दक्षिण भारतीय अभिनेते ठरले. त्यानंतर त्यांनी मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय काम केले. शिवाजी गणेशन, विजयकांत, सरथ कुमार, अजित कुमार, प्रशांत आणि विजय यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. विजयच्या 'सचिन' चित्रपटात त्यांनी अभिनेत्री जेनेलिया डिसूझाच्या वडिलांची भूमिका साकारून विशेष लोकप्रियता मिळवली.

चित्रपटांमधील संधी कमी झाल्यानंतर मोहन शर्मा यांनी छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. 'कोलांगळ', 'वाणी राणी', 'माया', 'मुंथनाई मुडिचू' आणि 'थालाट्टू' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी काम केले. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. २०१२ मध्ये त्यांनी 'नम्मा ग्रामम' या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. या चित्रपटाला तामिळनाडू आणि केरळ सरकारकडून गौरविण्यात आले होते. तसेच ते तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या निवड समितीचे सदस्यही राहिले आहेत.

वैयक्तिक आयुष्यातही मोहन शर्मा यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. आर्थिक अडचणींमुळे त्यांना चेन्नईतील 'पोएस गार्डन'मधील आलिशान घर विकावे लागले. सध्या त्यांच्या मित्रांनी आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी गुमिदिपुंडी येथील एका जैन वृद्धाश्रमात त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. तेथे अन्न आणि निवाऱ्याची सोय असली, तरी औषधोपचारांचा खर्च उचलणे त्यांना कठीण जात आहे.

मोहन शर्मा यांच्या परिस्थितीची माहिती मिळताच सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच मोहन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असून, पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्योगांच्या स्थलांतराच्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदेंची रॅपिड अ‍ॅक्शन! आधुनिक पद्धतीने चाकणचे खड्डे बुजवायला सुरूवात

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये एकनाथ शिंदेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

SCROLL FOR NEXT