Veen Doghantali Hi Tutena Video saam tv
मनोरंजन बातम्या

Veen Doghantali Hi Tutena Video : स्वानंदीचा रुद्रावतार! शेवटची संधी दिली अन् दिराला कानाखाली लगावली; समरनेही घेतला 'हा' मोठा निर्णय

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत धक्कादायक वळण येणार आहे. समर आपल्या भावावर प्रचंड भडकतो तर स्वानंदी चक्क दिराला थोबाडीत मारते.

Shreya Maskar

'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये अंशुमनचे खोटे सर्वांसमोर येते.

स्वानंदी अंशुमनच्या थोबाडीत मारते.

समर अंशुमनला शेवटची संधी देतो.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका ही प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. एकीकडे समर आणि स्वानंदीचे प्रेमाचे नाते फुलताना दिसत आहे. तर दुसरीकडे चिंगी गरोदर असल्याचे राजवाडेंच्या कुटुंबात सर्वांना समजते. सध्या मालिकेत अंशुमनचे लग्नाचा सीन पाहायला मिळत आहे. नुकताच 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात स्वानंदीचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे.

स्वानंदीला चिंगीचे मेडिकल रिपोर्ट्स सापडतात. जेव्हा ती सर्वांना चिंगी अंशुमनच्या मुलाची आई होणार असल्याचे सांगते तेव्हा अंशुमन हे सर्व खोटे असल्याचे बोलतो. स्वानंदी चिंगीला लग्न मंडपात घेऊन येते आणि अंशुमनचे लग्न थांबवते. आपल्या भावाचे असे कृत्य पाहून समीरला मोठा धक्का बसतो.

प्रोमोमध्ये नेमकं काय?

स्वानंदी अंशुमनच्या कानाखाली मारते. त्यानंतर समर म्हणतो, "तुला मी शेवटची संधी देतोय अंशुमन, आता तू माझ्याशी खरं बोललास ना...तर निदान मी तुझ्याशी माणूस म्हणून नीट वागेन. पण, जर तू ही जबाबदारी नाकारलीस आणि DNA टेस्टमध्ये हे मुल तुझेच असल्याचे समजले तर विषय संपला... या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद... यापुढे तुझे कोणाशीही कुठलेच नाते नसेल... "

समरचे ऐकल्यावर अंशुमन काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बाळाची जबाबदारी स्वीकारणार की DNA टेस्ट करणार? मालिकेने खूपच रंजक वळण घेतले आहे. या प्रोमोवर नेटकरी भरभरून कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सायंकाळी ७:१५ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: महागडे टोनर नको! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी तयार करा गुलाबपाणी; त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो

काँग्रेस प्रसिद्धीसाठी खालच्या स्तरावर उतरलीय; मुख्यमंत्री फडणवीस संतापले

Dark Underarms: अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय करताय? डॉक्टरांनी सांगितल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

एकदा खाल तर खातच राहाल अशी कुरकुरीत ओव्याच्या पानांची भजी

Pune Crime: नणंद- भावजयमध्ये टोकाचा वाद, ९ महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेविक्वक ओतलं; पुण्यातील संतापजन घटना

SCROLL FOR NEXT