Veen Doghantali Hi Tutena Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Veen Doghantali Hi Tutena Video : "राजवाडे आय लव्ह यू..."; स्वानंदी देणार प्रेमाची कबुली, समरसोबत मारणार वडाला सात फेऱ्या

Vat Purnima Special Episode : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत वटपौर्णिमेला स्पेशल भागात अखेर स्वानंदी आपल्या मनातील प्रेम व्यक्त करताना दिसणार आहे. मालिकेत नेमकं काय घडणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत वटपौर्णिमेला स्पेशल भाग रंगणार

वटपौर्णिमेला स्वानंदी आपले प्रेम समरसमोर व्यक्त करणार

समर - स्वानंदीला भन्नाट सरप्राइज देतो

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या वटपौर्णिमेला स्पेशल भाग पाहायला मिळत आहे. समर स्वानंदीला भन्नाट सरप्राइज देताना दिसत आहे. दोघांच्या नात्याची नवी सुरुवात होत आहे. समर स्वानंदीसाठी गुलाबाची फुल, हार्टच्या आकाराचे फुगे यांनी रुम सजवतो. त्यानंतर घुडघ्यावर बसून स्वानंदीला प्रपोज करतो की, म्हणतो, "आय लव्ह यू..." आता स्वानंदी याचे उत्तर काय देणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

नुकताच 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात स्वानंदी समरकडे आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. या प्रोमोवर चाहते भरभरून कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. सनर-स्वानंदीला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत आहेत. समर-स्वानंदी एकत्र मिळून वटसावित्रीची पूजा करताना दिसत आहेत. मालिकेत पुढे नेमकं काय घडणार पाहा.

व्हिडीओत नेमकं काय?

स्वानंदी वटसावित्रीची पूजा करण्यासाठी वडाच्या झाडापाशी जात असताना स्वतःशीच बोलते की, "येथे मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे साहस करायला आले आहे... हे खरंच येणार नाही की काय?" तेवढ्यात स्वानंदीला समर वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मिरताना दिसतो. जे पाहून स्वानंदीला खूपच आनंद होतो. समर बोलतो की, "तुम्ही माझ्यासाठी उपवास धरलात, माझ्या दीर्घायुष्यासाठी पूजा करणार आहात. मलापण माझी बायको दीर्घायुष्यी असायला हवी...निरोगी असायला हवी..." तेव्हा स्वानंदी म्हणते की, "जेवढेपण माझे जन्म होतील मला तुम्हीच जोडीदार म्हणून हवे आहात..." त्यावर समर बोलतो," माझ्या प्रश्नाचे उत्तर त्याचं काय?" पुन्हा स्वानंदी बोलते की, "राजवाडे आय लव्ह यू..."

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "समरच्या सोबतीने स्वानंदीची वटपौर्णिमा होणार अधिक खास!" 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होते. या मालिकेचा १ जुलैचा भाग खूपच खास आहे. समर-स्वानंदीचा खऱ्या अर्थाने नवरा-बायको म्हणून प्रवास सुरू होणार आहे. आता मालिकेत आणखी कोणते नवीन ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणार तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर, शेतात साचले पाणी

Crime: महाराष्ट्र हादरला! मित्रासमोरच महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ काढून केला व्हायरल; १४ जण अटकेत

Rain Alert : राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पुढील ४८ तास महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Petrol-Diesel: सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ जुलैपासून होणार लागू

युरोपात भीषण उष्णतेनं हाहाकार, उष्णतेनं युरोपमध्ये 1300 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT