Veen Doghantali Hi Tutena SAAM TV
मनोरंजन बातम्या

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदीचा अपमान करणाऱ्या सुष्मिताला समरनं खडसावलं, मालिकेत नवा ट्विस्ट | VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मल्लिका सुष्मिताचा वापर करून स्वानंदी आणि समरला त्रास देताना दिसत आहे. येणाऱ्या भागांमध्ये समर सुष्मितावर भडकताना दिसणार आहे.

Shreya Maskar

सुष्मिता राजवाडेंच्या घरात नवा गोंधळ घालते.

समर सुष्मितावर चांगलाच भडकतो

समर सर्वांसमोर स्वानंदीची बाजू घेतो.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. सुष्मिता चलाखीने समरकडून घरातील सर्व अधिकार काढून घेते. मल्लिका सुष्मिताचा वापर करून स्वानंदीच्या विरोधात जाते. तर अंशुमन स्वानंदीला धमकी देतो की, सहा महिन्यात तुझे आणि समरचे नाते तोडणार...अशात आता मालिकेचे नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात समर सुष्मितावर चांगलाच भडकताना दिसत आहे.

मालिकेत पुढे काय घडणार?

आजी समरला फोन करते आणि बोलते की, "सुष्मिताच्या अधिकारांचे काहीतरी कर बाबा...अरे काही करत सुटली आहे ती..." त्यानंतर सुष्मिता मोठ्या आवाजात स्वानंदीला म्हणते की, मला खरंच कंटाळा आला आहे, या सर्व गोष्टींचा..."तू मला सतत डोमिनेट करत आहेस ना की पुढे नोकर बनवून टाकशील मला या घरातलं..." हे सर्व घराच्या दारावर उभा राहिलेला समर ऐकतो आणि बोलतो की, "सुष्मिता, बस झालं...शांत बस...माझ्या बायकोवर आवाज चढवून बोललेले मी खपवून घेणार नाही. माफी माग त्यांची..."

नवीन प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "स्वानंदीचा झालेला अपमान पाहून समर चिडणार..." या व्हिडीवर प्रेक्षक भरभरून कमेंट्स करत आहेत. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचे येणारे भाग खूपच मनोरंजक असणार आहे. सुष्मितावर समर भडकतो, त्यामुळे आता मल्लिका आणि अंशुमन स्वानंदी विरोधात नवीन कोणता डाव रचणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते.

समर - स्वानंदी डेट

घरात एकीकडे सुष्मिताचा गोंधळ असताना दुसरीकडे समर-स्वानंदीचे नाते खुलताना दिसत आहे. भरपावसात समर-स्वानंदी निवांत वेळ घालवतात. समर चक्क स्वानंदीसोबत टपरीवर जाऊन चहा पितो. दोघे छान गप्पा मारताना दिसतात. समर - स्वानंदी कायम एकमेकांसाठी उभे राहिलेले दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसामुळे धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदीला आला पूर

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT