Veen Doghantali Hi Tutena saam tv
मनोरंजन बातम्या

Veen Doghantali Hi Tutena : मल्लिकाचं नवं कट कारस्थान; समर-स्वानंदीमध्ये गैरसमजाची ठिणगी, नात्यात येणार दुरावा? VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत आता मल्लिका समर -स्वानंदीच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी नवीन प्लान करताना दिसत आहे. मालिकेत नेमकं काय घडणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

समर-स्वानंदीच्या नात्यात दुरावा

समर-स्वानंदीमध्ये गैरसमजाची ठिणगी

मल्लिका करणार समर-स्वानंदीला वेगळे

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या समर-स्वानंदीचे प्रेम खुलताना दिसत आहे. दोघे मस्त एकत्र वेळ घालवताना एकमेकांसाठी उभे राहताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे मल्लिका काकू आणि अंशुमन यांचे नाते तोडण्यासाठी प्लान करत आहेत. अंशुमन स्वानंदीला धमकीही देतो की, सहा महिन्यात तिला समरपासून वेगळे करणार...अशात आता 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा नवीन प्रोमो आला आहे, ज्यात समर-स्वानंदीत दुरावा आल्याचे दिसत आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मल्लिका काकू स्वानंदीच्या आईशी फोनवर बोलतात की, "अहो! काय ऐकते मी, तुम्ही पडलात, मग आराम करा बघू..." त्यावर स्वानंदीची आई बोलते, "आमच्या घरातील उपाशी राहतील, मी अशी बेडवर राहिली तर" त्यावर मल्लिका बोलते की, "तुमच्या मुलीला बोलवून घ्या ना, सेवा करायला...स्वानंदी तुमच्याकडे आली ना, तर समर आणि तिचे बोलणे होणार नाही याची मात्र काळजी घ्या तुम्ही... "

त्यानंतर समर स्वानंदीला फोन करतो मात्र स्वानंदीची आई त्याचा फोन कट करते. दुसरीकडे जेव्हा स्वानंदी समरला कॉल करते तेव्हा मल्लिका काकू स्वानंदीचा फोन कट करतात. यामुळे समर-स्वानंदी दोघांच्याही मनात प्रश्न उपस्थित होतात. तसेच दोघेही दुखावले जातात. आता मल्लिकाने रचलेला हा प्लान समर-स्वानंदीला समजणार की दोघांमध्ये दुरावा वाढत जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "समर आणि स्वानंदीमध्ये गैरसमजाची ठिणगी!" 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडते. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी शिवाजी खांडेकर रिंगणात

Earthquake : पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के; ५.२ तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; इंडोनेशिया हादरलं

Famous Director Death: ज्येष्ठ प्रयोगशील दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला संपवलं, भरचौकात ४ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO समोर

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT