Veen Doghantali hi Tutena Saam Tv
मनोरंजन बातम्या

Veen Doghantali hi Tutena: समर-स्वानंदी गेले नाटक पाहायला; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये स्वप्नील जोशीची एन्ट्री

Veen Doghantali hi Tutena: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत समर-स्वानंदीची हटके डेट रंगणार आहे. 'लग्नपंचमी' नाटक पाहताना स्वप्नील जोशीची भेट होणार असून प्रोमोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Shruti Vilas Kadam

Veen Doghantali hi Tutena: 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका नेहमीच वेगळे प्रयोग करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. नुकताच या मालिकेचा संवादविरहित विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता मालिकेत आणखी एक खास ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यावेळी समर आपल्या लाडक्या पत्नी स्वानंदीला एका वेगळ्याच डेटवर घेऊन जाणार आहे.

साधारणपणे डेट म्हटलं की रोमँटिक डिनर किंवा चित्रपट पाहायला जाण्याची कल्पना अनेकांच्या मनात येते. मात्र, समर आणि स्वानंदीची डेट यापेक्षा वेगळी आणि खास असणार आहे. दोघेही ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे 'लग्नपंचमी' हे गाजलेले नाटक पाहण्यासाठी जाणार आहेत. या विशेष भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नाटक सुरू असताना रंगमंचावरील रोमँटिक प्रसंग पाहून समर स्वतःला आणि स्वानंदीला त्या पात्रांच्या जागी कल्पना करताना दिसणार आहे. त्यामुळे या भागात रोमँटिक आणि हलक्याफुलक्या क्षणांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनीच 'लग्नपंचमी' या लोकप्रिय नाटकाचे लेखन केले आहे. या नाटकात अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री विदुला चौगुले प्रमुख भूमिकेत आहेत.

प्रोमोमध्ये आणखी एक खास क्षण पाहायला मिळतो. समर नाटक पाहण्यासाठी आल्याचे समजताच स्वप्नील जोशी त्याला आणि स्वानंदीला भेटण्यासाठी बॅकस्टेज बोलावतो. आपल्या आवडत्या अभिनेत्याला प्रत्यक्ष भेटल्याने स्वानंदीचा आनंद गगनात मावेनासा होतो. दोघेही नाटकातील कलाकारांशी संवाद साधताना दिसतात. या भेटीनंतर समर आणि स्वानंदीचे नाते आणखी घट्ट होत असल्याचे या भागातून दाखवण्यात येणार आहे.'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा हा विशेष भाग ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून समर-स्वानंदीची ही हटके डेट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भर पावसात ठाकरे गटाचे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Apple vs Banana: केळी की सफरचंद? फायबरसाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर

असंघटित व्यवसायात महाराष्ट्र पिछाडीवर; टॉप १० मध्ये एकाही जिल्हा नाही, केंद्र सरकारची धक्कादायक आकडेवारी

Skin Care: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा आहे? सकाळी उठल्यावर करा 'या' ७ गोष्टी; त्वचा दिसेल ग्लोइंग आणि हेल्दी

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड घडणार?, दिल्ली दौऱ्याआधी मुख्यमंत्र्यांची बड्या नेत्यासोबत बंद दाराआड चर्चा

SCROLL FOR NEXT