Varun Tej - Lavanya Tripathi Twitter
मनोरंजन बातम्या

Lavanya Tripathi Engagement : राम चरणचा भाऊ आणि अभिनेत्री लावण्या त्रिपाठीचा उद्या साखरपुडा; आमंत्रण पत्रिका व्हायरल

Varun Tej - Lavanya Tripathi: वरुण तेज आणि लावन्या यांच्या एंगेजमेंटची बातमी गुरुवारी सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली.

Pooja Dange

Ram Charan Brothers Engagement : साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार वरुण तेज आणि लावन्या त्रिपाठी सध्या चर्चेत आहेत. 9 जून रोजी वरुण त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री लावन्या त्रिपाठीसोबत एंगेजमेंट करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या जोडप्याचे एंगेजमेंट कार्डही समोर आले आहे, त्यामुळे या जोडप्याच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

वरुण तेज आणि लावन्या यांच्या एंगेजमेंटची बातमी गुरुवारी सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली. या जोडप्याचे एंगेजमेंट कार्ड ट्विटरवर शेअर केले आणि ट्विटमध्ये लिहिले आहे, “मेगा राजकुमार @IAmVarunTej आणि @Itslavanya 9 जून 2023 रोजी साखरपुडा करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून वरुण तेजचे नाव लावन्या त्रिपाठीसोबत जोडले जात होता. (Latest Entertainment News)

वरुण तेज आणि लावन्या या वर्षाच्या अखेरीस लग्न करू शकतात, असे देखील बोलले जात आहे. या दोघांनी 2017 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती.

गेल्या काही वर्षांपासून वरुण तेजचे नाव लावण्या त्रिपाठीसोबत जोडले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहे. मात्र आजपर्यंत दोघांनी एकमेकांचे फक्त चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे. दोघांची एंगेजमेंट त्यांच्या घरी किंवा हैदराबादमध्येच एखाद्या ठिकाणी होऊ शकते. यादरम्यान या जोडप्याच्या कुटुंबीयांचा सहभाग असणार आहे.

वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांची जोडी 'मिस्टर' और अंतरिक्षम 9000 KMPH' या चित्रपटांमध्ये दिसली होती. 2017 पासून डेट करायला सुरुवात केली होती. वरुण तेज हा चिरंजीवीचा पुतण्या आणि राम चरणचा चुलत भाऊ आहे. कोनिडेला नागेंद्र उर्फ ​​नागा बाबू हा मेगास्टार चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा भाऊ आहे. नागा बाबू हे वरुण तेजचे वडील आहेत.

वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांच्या भव्य साखरपुडा समारंभात राम चरण, उपासना कोनिडेला, साई धरम तेज, अल्लू सिरिश, सुष्मिता कोनिडेला, श्रीजा कोनिडेला, पवन कल्याण आणि चिरंजीवी यांच्यासह संपूर्ण कोनिडेला कुटुंब उपस्थित राहणार आहे. ()

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

Pandharpur Crime : पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या

SCROLL FOR NEXT